लेकीला बॉलीवूड पदार्पणावर शाहरुखनं दिले खास सल्ले; काय म्हणाला किंग खान?

झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चिज' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं अन् यातील स्टार किड्सची एकच चर्चा सुरु झाली.
Shah Rukh Khan's piece of advice to Suhana
Shah Rukh Khan's piece of advice to SuhanaGoogle

झोया अख्तर दिग्दर्शित आगामी 'द आर्चिज'(The Archies) सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं अन् यातील स्टार किड्सची एकच चर्चा सुरु झाली. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान(Suhana Khan),दिवंगत श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. हे तिघंही हटके लूक आणि पडद्यावरील त्यांच्या बिनधास्त वावरामुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 'द आर्चीज' सिनेमाच्या टीझरनंतर सध्या गाजतेय ती शाहरुखनं लेकीसाठी केलेली भावूक पोस्ट. या पोस्टच्या माध्यमातून शाहरुखनं लेकीचं अभिनंदन करताना तिला काही सूचना दिल्या आहेत.

शाहरुख खाननं 'द आर्चिज' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर लेक सुहाना खानसाठी खास पोस्ट शेअर करीत आपल्या मुलीसाठी खास मेसेजही केला आहे. शाहरुखने या पोस्टच्या माध्यमातून सुहाना खानला काही महत्त्वाचे सल्लेही दिले आहेत. तो म्हणाला आहे, ''तू कधीच परफेक्ट बनू शकत नाही हे लक्षात ठेव, पण तू जशी आहेस तशीच तू बनून राहिलीस तर परफेक्शनच्या जवळपास नक्कीच पोहोचू शकशील. एक कलाकार म्हणून नेहमी प्रेमळ,प्रामाणिक रहा. तुझ्या अभिनयाच्या माध्यमातून जी पडद्यावर उरशील ते कायम तुझंच राहिल. माझ्या लाडक्या मुली,तु इथवर पोहोचण्यासाठी खूप कष्ट केलेयस,तो तुझा एक मोठा प्रवास आहे,पण लोकांच्या हृद्यात स्थान मिळवेपर्यंत तो कायम सुरु राहणार आहे. खुप यश मिळव,आणि कायम हसत रहा''.

Shah Rukh Khan's piece of advice to Suhana
सुशांत सोबतची 'नाइट आऊट' अन् त्याचे सीक्रेट्स; कियारा अडवाणीचा मोठा खुलासा

'द आर्चिज' हा सिनेमा प्रसिद्ध कॉमिक्सवर आधारित आहे. या सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून मोठी चर्चा होती. आता टिझर पाहिल्यानंतर याविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com