शाहरूख खानच्या मुलासाठी ट्री हाऊस 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

शाहरूख खानचा मुलगा अब्राम याचे लाड गौरी आणि शाहरूख मोठ्या हौसेने पुरवताना दिसत आहेत. छोट्या अब्रामसाठी आता एक ट्री हाऊस पण बनवण्यात आले आहे. गौरीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो टाकून हे सांगितले.

शाहरूख खानचा मुलगा अब्राम याचे लाड गौरी आणि शाहरूख मोठ्या हौसेने पुरवताना दिसत आहेत. छोट्या अब्रामसाठी आता एक ट्री हाऊस पण बनवण्यात आले आहे. गौरीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो टाकून हे सांगितले.

ट्री हाऊसची रचना हुबेहुब एखाद्या छोट्या घरासारखी करण्यात आलीय. या घरात जायला अब्रामसाठी छोट्या पायऱ्या ही करण्यात आल्या आहेत. घराच्या आतही त्याला खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. खेळणी ठेवण्यासाठी पण वेगळी जागा आहे. हे ट्री हाऊस साबू सायरिल यांनी साकार केले असून, त्यांनी शाहरूखच्या मन्नतसाठीही काम केलेले आहे. ते प्रॉडक्‍शन डिझायनर आहेत. गौरी खान स्वत: इंटिरियर डिझायनर असूनही तिने हे काम केलेलं नाही. अर्थातच तिला आपल्या मुलासाठी कोणा एक्‍सपर्टकडूनच हे काम करून घेणे जास्त पसंत पडले असावे... 
 
Web Title: Shah Rukh Khan's son, Tree House