रंग प्रेमाचा? 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

मालिकांमध्ये काम करत असणाऱ्या जोड्या एकमेकांच्या प्रेमात पडणं ही काही नवीन गोष्ट नाही. सनाया इराणी- मोहित सेहगल (मिले जब हम तुम), दिव्यांका त्रिपाठी- विवेक दाहिया (ये है महोब्बते), करण सिंग ग्रोवर- जेनिफर विंगेट (दिल मिल गए), अशी अनेक उदाहरणं देता येतील. सोनी टीव्हीवरील "कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील जोडीमध्येही काहीसं असंच झालंय. या मालिकेतील एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख लवकरच साखरपुडा करणार आहेत. ऐकून आनंद झाला ना?

मालिकांमध्ये काम करत असणाऱ्या जोड्या एकमेकांच्या प्रेमात पडणं ही काही नवीन गोष्ट नाही. सनाया इराणी- मोहित सेहगल (मिले जब हम तुम), दिव्यांका त्रिपाठी- विवेक दाहिया (ये है महोब्बते), करण सिंग ग्रोवर- जेनिफर विंगेट (दिल मिल गए), अशी अनेक उदाहरणं देता येतील. सोनी टीव्हीवरील "कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील जोडीमध्येही काहीसं असंच झालंय. या मालिकेतील एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख लवकरच साखरपुडा करणार आहेत. ऐकून आनंद झाला ना? काही महिन्यांपूर्वीच त्या दोघांमध्ये काहीही नसल्याच्या बातम्या आल्याने त्यांचे फॅन्स नाराज झाले होते; पण आता या दोघांच्या साखरपुड्याची बातमी ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला असेल. त्या दोघांमध्ये मध्यंतरी वादविवादही सुरू होते. त्याचा त्यांच्या मालिकेतील भूमिकांवरही परिणाम होत होता; पण नुकतंच एरिकाने शाहीरच्या वाढदिवसाला त्याला एक छानशी भेट दिली आणि शाहीर विरघळला. एरिकाने त्याच्यासाठी बनविलेला व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवरही टाकला होता. त्या वेळी त्याच्या कुटुंबीयांनी शाहीरला एरिकाबरोबर साखरपुडा करण्याचा सल्ला दिला. पुढच्याच महिन्यात शाहीर आणि एरिका काश्‍मिरमध्ये त्यांच्या गावी जाऊन साखरपुडा करणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच ही गोड बातमी ऐकून साहिर आणि एरिकाचे फॅन्स सुखावणारच; पण सगळ्यांना हे एप्रिल फूल तर नाही ना, असंही वाटतंय.  
 

Web Title: Shaheer Sheikh Opens Up About His Relationship With Co-Star Erica Fernandes