शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; जाणून घ्या नवीन तारीख | Jersey Movie Release Date | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jersey Movie Release Date Change

शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; जाणून घ्या नवीन तारीख

शाहिद कपूरच्या(Shahid Kapoor) बहुचर्चित 'जर्सी' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाकडे शाहिदचे चाहते नजर लावून बसलेय. त्यात सिनेमा प्रदर्शित होता-होता आता लांबणीवर ढकलला गेलाय यामुळे चाहते नाराज होणार यात शंकाच नाही. आता 'जर्सी' सिनेमा २२ एप्रिल,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिदचा हा स्पोर्ट ड्रामा आता १४ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. सुरुवातीला तर ३१ डिसेंबर, २०२१ ला हा सिनमा प्रदर्शित होणार होता. पण अचानक ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूनं आपलं डोकं वर काढल्यानं निर्बंध लादले गेले अन् 'जर्सी'च्या निर्मात्यांनी सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. या सिनेमात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर,पंकज कपूर देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा: यामी गौतमच्या मदतीला विवेक अग्निहोत्री गेले धावून; काय घडलंय नेमकं?

'जर्सी'च्या निर्मात्यांनी अनेकदा प्रदर्शनाच्या तारखा आतापर्यंत बदलेलल्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे शाहिदचे चाहते मात्र नाराज आहेत. 'कबीर सिंग' या शाहिदच्या सिनेमानंतर त्याची भलतीच क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच 'जर्सी' मध्ये शाहिद स्पोर्ट्स ड्रामा रंगवताना काय अॅटिट्युडमध्ये दिसणार याबद्दल नक्कीच उत्सुकता असणार, 'जर्सी'च्या निर्मात्यांनी बॉक्सऑफिसवर 'KGF: Chapter 2' सोबत टक्कर होऊ नये आणि कुणाचचं नुकसान होऊ नये म्हणून सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'KGF: chapter 2' सिनेमात साऊथ स्टार यश,संजय दत्त,रविना टंडन,श्रीनिधी शेट्टी,प्रकाश राज असे कलाकार आहेत.

हेही वाचा: छोट्या पडद्यावरील अभिनेत्याकडे 'न्यूड फोटो'ची डिमांड केल्यानं उडालीय खळबळ

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटमधून 'जर्सी'च्या प्रदर्शनाची बातमी कळाली. त्यांनी म्हटलंय,''ब्रेकिंग न्यूज...जर्सीचं प्रदर्शन आठवडाभरासाठी पुढे ढकललं,आता सिनेमा २२ एप्रिल रोजी सिनेमागृहात भेटीला येणार''. 'जर्सी' या सिनेमाची निर्मिती दिल राजू,एस.नागा वामसी आणि अमन गिल यांनी मिळून केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन गोथम तिन्नानुरी याचं असून ,सिनेमात एका क्रिकेटरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळत असूनही त्याला मिळालेलं खेळातलं अपयश दाखवताना केवळ मुलाला क्रिकेटची जर्सी गिफ्ट देण्यासाठी वयाची तिशी ओलांडल्यावरही क्रिकेटमध्ये करिअर करण्याची धडपड पुन्हा सुरु करणं आणि जोमाने प्रयत्न करीत यश मिळवणं असा एकंदरीत कथानकाचा ग्राफ आहे.

हेही वाचा: Video: अक्षयच्या स्विमिंगपूलमध्ये पडला 'चतुर'; जीवरक्षक बनून वाचवले प्राण

शाहिदचा 'जर्सी' सिनेमा हा नॅशनल अॅवॉर्ड जिकंलेल्या तेलुगु 'जर्सी' सिनेमाचा रीमेक आहे. तेलुगु सिनेमात नानी या साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यानं महत्त्वाची भूमिका साकरली आहे. त्यानं शाहिदला 'जर्सी' सिनेमासाठी शुभेच्छा दिल्यात. शाहिद खूप चांगला अभिनेता आहे अशा शब्दात शाहिदचं कौतूक साऊथ स्टार नानीनं केलं आहे.

'जर्सी' सिनेमात शाहिद आणि पंकज कपूर हे बाप-लेक एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं शाहिदनं एका मुलाखी दरम्यान म्हटलं होतं,''मला वाटलं नव्हतं मी अभिनेता होईन, कारण अनेकांना माहितीच नव्हतं मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे. माझे आई-वडील विभक्त झाल्यानंतर मी मुंबईत राहत नव्हतो. मी खूप उशिरा मुंबईत आलो. माझी आई सिंगल मदर होती. मी थोडा मोठा झाल्यावर जेव्हा मुंबईत आलो, तेव्हाही कोणाला सांगितलं नाही की पंकज कपूर यांचा मुलगा आहे. त्यामुळे मला खात्री नव्हती लोकं मला स्विकारतील की नाही. कारण त्यांच्यासाठी मी या इंडस्ट्रीसाठी पूर्णपणे नवीन मुलगा होतो. ज्याचं इथे कुणीच नाही''.

Web Title: Shahid Kapoors Jersey Release Date Postponed Film Avoids Clash With Kgf

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..