Video: अक्षयच्या स्विमिंगपूलमध्ये पडला 'चतुर'; जीवरक्षक बनून वाचवले प्राण

अक्षय अभिनेता म्हणून ग्रेट आहेच पण माणूस म्हणून तो किती ग्रेट आहे याचा हा व्हिडीओ उत्तम उदाहरण आहे.
Akshay Kumar shared a video that explains his statement
Akshay Kumar shared a video that explains his statementGoogle

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करून सक्रिय असलेला पहायला मिळतो. अभिनेता नेहमीच आपल्या आयुष्यासंदर्भातल्या आणि सिनेमांसंदर्भातल्या अनेक पोस्ट शेअर करीत असतो. आता सध्या त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा मस्त आनंद घेत आहे.

या व्हिडीओला अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकाल की अक्षय कुमार पोहता पोहता स्विमिंग पुलच्या काठावर आलाय आणि चक्क एका चतुर किटकपक्ष्याला प्रेमानं फुंकर मारीत आहे. चतुराचे ओले झालेले छोटे पंख अक्षय फुंकर मारुन सुकवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर शेअर करीत अक्षयनं लिहिलं आहे की,''हा छोटासा मित्र आज सकाळी स्विमिंग पूलमध्ये घसरुन पडला आणि त्याला मदतीची गरज होती. थोडीशी आशा ,थोडंसं बळ त्याच्या पंखात मी फुंकर मारुन भरलं आणि तो परत उडायला लागला. तुम्हाला नाही वाटत आपल्या सगळ्यांना देखील या सगळ्याची गरज आहे. मनात आशा,जगण्याची इच्छा असली की उडायला पंखात बळ नक्कीच येईल''. असं व्हिडीओ पोस्ट करताना अक्षयने लिहिलं आहे.

Akshay Kumar shared a video that explains his statement
गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची नवऱ्याला शिवीगाळ

अक्षय कुमारच्या या व्हिडीओ पोस्टला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळालेयत. तर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अक्षयची पत्नी अभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्नाची प्रतिक्रियाही लक्षवेधी ठरतेय. त्या प्रतिक्रियेवरनं कळतंय की दोघांमध्ये इथे किती प्रेम आहे . ट्विंकलनं लिहिलं आहे,''तु माझ्यासाठी देखील खूप काही करतोस''.

Akshay Kumar shared a video that explains his statement
मनिष मल्होत्रा की सब्यासाची? लग्नात कोणत्या डिझायनरचा लेहेंगा घालणार आलिया?

अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रांना ट्वीटरवर टॅग करत माहिती दिली होती की, त्यानं आपल्या आगामी 'सेल्फी' सिनेमाचं शूटिंग भोपाळमध्ये केलं आहे. सेल्फी मध्ये अक्षय कुमारसोबत इम्रान हाश्मी,नुसरत भरुचा आणि डायना पेंटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय कुमारच्या आगामी काही सिनेमांविषयी आपण बोललो तर आता 'रामसेतु','पृथ्वीराज' असे मोठे सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. नुकताच अक्षयचा 'बच्चन पांडे' सिनेमा प्रदर्शित होऊन गेला. यात अक्षयनं गॅंगस्टरची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com