शाहिदच्या भावाची दीपिकासोबत बॉलिवूड एन्ट्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

स्टार किडची बॉलीवूड एन्ट्री ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. तो आता साधीसुधी नाही तर ग्रॅंड एन्ट्री घेतोय. तीसुद्धा मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणबरोबर. इराणी फिल्ममेकर माजिद माजीदी यांच्या "फ्लोटिंग गार्डन' या इंग्रजी चित्रपटात तो दीपिकाच्या भावाची भूमिका करणार आहे, अशी चर्चा आहे. नुकतेच त्याला या रोलसाठी विचारण्यात आले होते. 2015 मध्ये "शानदार' चित्रपटातून शाहिदची बहिण सना कपूरने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

स्टार किडची बॉलीवूड एन्ट्री ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. तो आता साधीसुधी नाही तर ग्रॅंड एन्ट्री घेतोय. तीसुद्धा मस्तानी गर्ल दीपिका पदुकोणबरोबर. इराणी फिल्ममेकर माजिद माजीदी यांच्या "फ्लोटिंग गार्डन' या इंग्रजी चित्रपटात तो दीपिकाच्या भावाची भूमिका करणार आहे, अशी चर्चा आहे. नुकतेच त्याला या रोलसाठी विचारण्यात आले होते. 2015 मध्ये "शानदार' चित्रपटातून शाहिदची बहिण सना कपूरने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. शाहिद कपूरची आई नीलिमा अजीमने शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता राजेश खट्टर यांच्याशी विवाह केला होता. त्यांचा मुलगा हा इशान खट्टर आहे.शानला अभिनसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात नाही का?

Web Title: Shahid's brother with dipika Bollywood entry

टॅग्स