esakal | शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...
sakal

बोलून बातमी शोधा

शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...

शाहरुखच्या ड्रायव्हरची 12 तास चौकशी: त्यानं कबूल की...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (bollywood king khan shahrukh khan) मुलाच्या आर्यनच्या (aryan khan) डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेमध्ये आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. त्यात शाहरुखच्या ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली आहे. त्यानं त्या चौकशी दरम्यान काही महत्वाचे खुलासेही केले आहे. एनसीबीनं त्याच्याकडे तब्बल बारा तास चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्या माहितीच्या आधारावर आर्यनला दिलासा मिळणार की त्याच्या अडचणीत वाढ होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे. आता एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार त्या क्रुझवर असलेल्या एका मॉडेलच्या रुममध्ये ड्रग्ज सापडले आहे. सध्या ती मॉडेल एनसीबीच्या कोठडीत आहे. तिचे नाव मुनमुन धमेचा असल्याची माहिती पुढे आली आहे.

एनसीबीनं आता शाहखच्या ड्रायव्हरचीही चौकशी केली आहे. त्याची बारा तास चौकशी करण्यात आली असून त्या दरम्यान काही महत्वाची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हरनं हे मान्य केलं आहे की, त्यानं आर्यन खान आणि अरबाज मर्चट यांना त्या क्रुझ टर्मिनलवर सोडले होते. एनसीबीनं शाहरुखच्या ड्रायव्हरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे आर्यन खान आणि त्याचा मित्र यांना त्या क्रुझवर सोडले होते का, याप्रकरणाविषयी माहिती विचारण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरनं सांगितलं आहे की, आपण त्या दोघांना क्रुझवर स़ोडले होते. एनसीबीनं त्या ड्रायव्हरचा जबाब नोंदवून घेतला आहे.

एनसीबी ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग आर्यन खानच्या विरोधात करु शकते. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास न्यायालयापुढे आर्यनला जामीन मागण्य़ासाठीचा त्रास वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणानं बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातून वेगवेगळ्या प्रकारची माहितीही समोर येते आहे. ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीतून असेही दिसून आले आहे की, आर्यन खान, प्रतीक गाबा आणि अरबाज मर्चंट हे आर्यनच्या मन्नत बंगल्यातून एकाच गाडीतून त्या क्रुझवर गेले होते.

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

loading image
go to top