पाठक बाईंचा उखाणा ऐकून तुम्हीही म्हणाल...Hardeek-Akshaya Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardeek-Akshaya Wedding, Ukhana Video

Hardeek-Akshaya Wedding: पाठक बाईंचा उखाणा ऐकून तुम्हीही म्हणाल...

Hardeek-Akshaya Wedding: मराठी इंडस्ट्रीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची जोरदा्र चर्चा सुरु होती ते अखेर आज मोठ्या धूमधडाक्यात पार पाडलं. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आपल्या आप्तेष्ट आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत देवाब्राह्मणांच्या साक्षीनं लग्नबंधनात अडकले. गेल्या महिन्याभरापासनं हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नासंबंधित अनेक विधी,त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालताना दिसत होते. त्यांच्या मेहेंदी,हळद आणि संगीत सोहळ्याच्या व्हिडीओजना तर काही वेळातच लाखोंनी व्ह्यूज मिळाले. (Hardeek-Akshaya Wedding, Ukhana Video)

हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाच्या व्हिडीओजनाही चाहत्यांची तितकीच पसंती मिळाली. लग्नातला सप्तपदीचा विधीही समोर आल्यावर लोकांना तो तितकाच भावला. लग्नात सर्वात मोठं आणखी एक आकर्षण असतं ते म्हणजे उखाण्याचं. आजकाल पुन्हा लांबलचक उखाण्यांचा ट्रेन्ड सुरू झालाय. ते ऐकण्यासही तितकेच गमतीशीर असतात. मुली खास हे उखाणे एखाद्या क्रिएटिव्ह व्यक्तीकडून लिहूनही घेतात. असं असताना मग अक्षया कशी मागे राहिल बरं. अक्षयानं देखील आपली मैत्रीण आणि अभिनेत्री रुचा आपटे हिच्या मदतीनं एक झक्कास उखाणा लिहिला. आणि लग्नाच्या सोहळ्यात तो उखाणा म्हणूनही दाखवला. सध्या सोशल मीडियावर अक्षयानं हार्दिकसाठी म्हटलेला हा उखाणा जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

हार्दिक-अक्षयाचं सूत जुळलं ते 'तुझ्यात जीव रंगला..' या मालिकेच्या सेटवर. या मालिकेत हार्दिक होता राणा दा तर अक्षया होती पाठक बाई...अर्थात याच मालिकेतील नावांनी आजतागायत त्यांना लोक संबोधतात. त्या दोघांना खरी ओळख या मालिकेनं मिळवून दिली. त्यामुळे अक्षयाचा उखाणा जर तुम्ही ऐकाल तर त्यांच्या प्रेमाचा संपूर्ण प्रवास त्या उखाण्याच्या माध्यमातून समोर येईल.