Cirkus Trailer: ट्रेलर सर्कसचा पण जलवा दीपिकाचा....मोठं सरप्राइज

रणवीर सिंग,जॅकलिन फर्नांडिस,पूजा हेगडे सोबत अनेक दिग्गज कलाकारांचा भरणा असलेल्या सर्कसचा ट्रेलर रिलीज झाला नाही तोच लाखो व्ह्यूज मिळवून गेला.
Ranveer Singh rohit shetty film cirkus trailer,Deepika Padukone Surprise...
Ranveer Singh rohit shetty film cirkus trailer,Deepika Padukone Surprise...Google

Cirkus Trailer: रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा मोठा धमाका करायला सज्ज झाले आहेत. दोघांचा आगामी सिनेमा 'सर्कस'चा अधिकृत ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रणवीर सिंग,जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडेच्या 'सर्कस'चा हा ट्रेलर एकदम खऱ्याखुऱ्या सर्कसची आठवण करुन देतोय. नजरेला दिसणारा कलरफूल नजारा,धम्माल-मस्ती,नाच-गाणं सगळाच आनंदी आनंद पहायला मिळतोय. ३.३८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 'गोलमाल'ची हलकीशी झलकही दिसतेय. ट्रेलरच्या शेवटी सिनेमातलं आयटम सॉंग मोठं सरप्राइज देऊन जातं. दीपिका पदूकोणनं हे सरप्राइज देत चाहत्यांना खूश केलं.(Ranveer Singh rohit shetty film cirkus trailer)

Ranveer Singh rohit shetty film cirkus trailer,Deepika Padukone Surprise...
Sharad Ponkshe: 'स्वातंत्र्याचं श्रेय कोणाचं?' गांधी की सावरकर...शरद पोंक्षे स्पष्टच बोलले

'सर्कस'च्या टीझर प्रमाणे ट्रेलरमध्येही बडे स्टार्स आपलं लक्ष वेधून घेताना दिसतात. 'सर्कस'मध्ये रणवीर व्यतिरिक्त बॉलीवूड ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस,पुजा हेगडे यांच्या भूमिकाही धमाल आणणाऱ्या आहेत. रणवीर सिंग आपल्याला आतापर्यंत अॅक्शन ते कॉमेडी ते लव्हरबॉय अशा अनेक भूमिकांमध्ये दिसला आहे,पण यावेळी रणवीर आपलं एका हटके भूमिकेत मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. सर्कसमध्ये इलेक्ट्रिक मॅन बनून रणवीरनं एकदम ढासू इलेक्ट्रिफाइंग परफॉर्मन्स दिला आहे.

Ranveer Singh rohit shetty film cirkus trailer,Deepika Padukone Surprise...
Ashneer Grover: अश्नीर ग्रोवरनी सलमानच्या 'बिग बॉस' ची इज्जतच काढली; म्हणाले,'या शो मधील सगळेच...'

सर्कस सिनेमाच्या माध्यमातून रणवीर आपल्याला मोठ्या पडद्यावर सर्कसचा ग्रॅंड अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात आपल्याला एक नाही तर दोन-दोन रणवीर दिसणार आहेत,जे मनसोक्त मनोरंजन करतील आपलं. रणवीर सिंगचा या सिनेमात डबल रोल आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीचा अचूक टायमिंग आणि मजेदार पंचेस आपल्याला बांधून ठेवतात.

जॅकलिन आणि रणवीरची जोडी सुद्धा फ्रेश वाटते. रणवीर आपल्या परफॉर्मन्ससोबत धम्माल डान्सनं देखील आकर्षित करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये रणवीरनं संपूर्ण लाइमलाइट आपल्याकडे खेचून घेतली आहे. पण यात मोठं सरप्राइज देते ती दीपिका पदूकोणची एन्ट्री. दीपिकानं आपल्या अदांनी आणि नृत्यानं चाहत्यांना खूश करून टाकलं आहे. रिअल लाइफ कपलला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहून चाहते मात्र डबल खूश झालेले दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com