किंग खानचा जलवा, 'ती' आयकॉनिक पोझ बनली ट्विटरवर हॅशटॅग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shahrukh khan iconic pose now a hashtag on twitter

किंग खानचा जलवा, 'ती' आयकॉनिक पोझ बनली ट्विटरवर हॅशटॅग!

बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. त्याच्या फॅन्ससाठी एक खास बाब समोर आली आहे, शाहरूख खानच सिग्नेचर स्टेप म्हणजेच 'ओपन आर्म्स पोझ'चे आता ट्विटरवर हॅशटॅगमध्ये रूपांतर झाले आहे! (shahrukh khan iconic pose now a hashtag on twitter)

हॅशटॅग शाहरुखखान आणि त्यासोबत त्याच्या आयकॉनिक पोझसारखे दिसणारे एक खास कॅरेक्टर देखील यामध्ये देण्यात आले आहे (#ShahRukhKhan𓀠 ), महत्वाचे म्हणजे, किंग खानने त्याच्या आगामी चित्रपट ' जवान'चा टीझर रिलीज केल्यानंतर अवघ्या 12 तासांतच हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागला होता.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'मैं हूं ना', 'दिल तो पागल है' आणि इतर चित्रपटांमध्ये शाहरूख खानने ही पोज देताना दिसला होता. 1995 मध्ये, SRK च्या राजने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मध्ये पंजाबच्या पिवळ्या मोहरीच्या शेतात काजोल म्हणजेचत सिमरनसाठी हात वर करत दिलेल्या या पोजने असंख्य तरुण चाहत्यांची मने जिंकली होती. 'कभी खुशी कभी गम' आणि 'मैं हूं ना', 'कभी अलविदा ना कहना' या गाण्यांमध्ये सुपरस्टार त्याच्या ट्रेडमार्क पोझचा समावेश केला होता.

हेही वाचा: कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना; 'भूलभूलैय्या2' स्टाइलनं दिली माहिती

दरम्यान, अॅटली दिग्दर्शित आणि जगभरातील चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असलेल्य जवान या चित्रपटाच्या टीझरला 12 मिलीयनहून अधिक व्हीव्यूज मिळाले आहेत आणि आता तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. जवान हा शाहरुखचा या वर्षी जाहीर झालेला तिसरा चित्रपट आहे.

अभिनेत्याचे आणखी दोन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत ज्यामध्ये सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' आणि राजकुमार हिरानीचा 'धुनकी' यांचा समावेश आहे. शाहारूख खान 'पठाण'मध्ये दीपिका पदुकोणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे, तर तापसी पन्नू ही 'धुनकी'मध्ये त्याच्या सोबत दिसणार आहे.

हेही वाचा: गडकरींची मोठी घोषणा; लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक!

Web Title: Shahrukh Khan Iconic Pose Now A Hashtag On Twitter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :shah rukh khan
go to top