esakal | मन्नतच्या बाहेर शाहरुख समर्थकांची गर्दी, सुशांतसिंगचे चाहतेही सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

मन्नतच्या बाहेर शाहरुख समर्थकांची गर्दी, सुशांतसिंगचे चाहतेही सहभागी

मन्नतच्या बाहेर शाहरुख समर्थकांची गर्दी, सुशांतसिंगचे चाहतेही सहभागी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाच्या आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुखला पाठींबा दिला आहे. त्यात दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. शाहरुखच्या मन्नत बंगल्यासमोर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यात बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांचाही समावेश आहे. य़ासगळ्य़ांनी आर्यनला जामीन मिळाला अशी मागणी करताना शाहरुखला आपला पाठींबा जाहीर केला आहे. आर्यन खानचा जामीन गेल्या काही सुनावणीपासून लांबणीवर पडताना दिसतो आहे. मात्र शाहरुख आणि आर्यन खानला प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

सुशांत सिंग राजपूत हा शाहरुखचा फॅन होता. या कारणानं त्याच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या ऋतिक रोशन, अलिया भट्ट, शेखर सुमन, विशाल ददलानी, पूजा भट्ट, हंसल मेहता यांचा समावेश आहे. ज्यादिवशी आर्यन खानला अटक झाली त्याच दिवशी बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं शाहरुखची भेट घेतली होती. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता शाहरुखच्या बंगल्याबाहेर म्हणजे मन्नतसमोर चाहत्यांनी गर्दी केली आहे. प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांनी सोशल मीडियावर याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, मी शाहरुखला अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. तो मोठा अभिनेता आहे. संघर्षांतून त्यानं त्याची ओळख निर्माण केली आहे. सध्या जे काही सुरु आहे त्यात सुसंगती दिसत नसल्याचे वाटते.

बॉलीवूड फिल्ममेकर करण जोहरनं शाहरुखची भेट घेतली आहे. शुक्रवारी आर्यन खानच्या जामीनावर सुनावणी झाली तेव्हा त्याला जामीन नाकारण्यात आला. आज पुन्हा त्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. एनसीबीला आतापर्यत या प्रकरणात काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. त्यांनी क्रुझवरुन मोठ्या प्रमाणात ड्रग्जही जप्त केले आहे. त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांची चौकशीही झाली आहे. त्यापैकी मॉडेल मुनमुन धमेच्यालाही अटक करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीनंतर आर्यनला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

हेही वाचा: NCB : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध?

loading image
go to top