Pathaan ने रचला मोठा इतिहास! पहिल्याच दिवशी शाहरुखच्या या सिनेमानं नोंदवले 'हे' 10 रेकॉर्ड्स..

'पठाण'ने ओपनिंग डे ला तब्बल ५७ करोडची कमाई केल्याचं समोर आलेलं आहे.
Shahrukh Khan
Shahrukh KhanGoogle
Updated on

Pathaan: शाहरुख खानच्या 'पठाण' ने बॉक्सऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमानं ओपनिंग डे लाच बॉक्सऑफिसवर ५७ कोटी कमावल्याची बातमी आहे. पठाणनं हिंदी भाषेत जवळपास ५५ करोडची कमाई केली आहे. तर २ करोड रुपये डब व्हर्जनमधून कमावले आहेत.यासोबतच सिनेमानं जगभरात १० नवीन रेकॉर्ड्स केले आहेत. चला जाणून घेऊया त्या रेकॉर्डविषयी.

Shahrukh Khan
Oscar नॉमिनेशनवर अनुपम खेरनी सोडलं मौन..म्हणाले,'RRR ला मिळालं आणि काश्मिर फाईल्सला नाही म्हणजे नक्कीच..'
Shahrukh Khan
Raju Srivastava Son:बापाचं छत्र हरपलं पण मुलानं करुन दाखवलं;राजू श्रीवास्तवच्या मुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

पठाण पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हिंदी सिनेमा बनला आहे. याआधी हा रेकॉर्ड हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' सिनेमाच्या नावावर नोंदवला गेला आहे.

तसंच,हिंदी भाषिक राज्यात 'पठाण' सगळ्यात अधिक कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा बनला आहे. याआधी अभिनेता यशच्या 'केजीएफ चॅप्टर २' सिनेमाच्या नावावर हा रेकॉर्ड नोंदवला गेला होता.

असं पाहिलं गेलंय की निर्माते लॉंग वीकेंड पाहून किंवा सण-समारंभ पाहून सिनेमे रिलीज करतात.शाहरुख खाननं आपला सिनेमा 'पठाण' वीकडेजला रिलीज केला. पण असं असताना देखील या सिनेमानं जोरदार कमाई केली.

इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की 'पठाण' च्या नावावर वीकडेजला रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये अधिक कमाई करण्याचा रेकॉर्डही जमा झालेला आहे.

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

Shahrukh Khan
Kangana Ranaut On Pathaan: कसा वाटला कंगनाला शाहरुखचा पठाण?, म्हणाली,'हे असे सिनेमे...'

आतापर्यंत यश राज फिल्म्सच्या दोन सिनेमांनी पहिल्या दिवशी ५० कोटींचा बिझनेस केला होता. तर या यादीत आता पठाण देखील सामिल झाला आहे.

'वॉर' ने ५३.३५ करोड तर 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नं ५२.२५ करोड कमावले होते. तर पहिल्या दिवशी ५० करोडहून अधिकचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा 'पठाण' तिसरा सिनेमा ठरला आहे.

याव्यतिरिक्त पठाण यश राज फिल्म्सचा सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा देखील बनला आहे.

'पठाण' मध्ये शाहरुख खान सोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. कदाचित शाहरुख,दीपिका आणि जॉनच्या करिअरमधला हा सगळ्या मोठा हिट सिनेमा ठरू शकतो. कारण शाहरुख,दीपिका,सिद्धार्थ आनंद ,जॉनच्या करिअरमधला हा ओपनिंग डे ला सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com