आर्यनला आणायला गेलेला रवी सिंह कोण आहे? पगार ऐकून विस्फारतील डोळे

शाहरुखचा इतका ज्याच्यावर विश्वास आहे, तो रवी सिंह कोण आहे?
आर्यनला आणायला गेलेला रवी सिंह कोण आहे? पगार ऐकून विस्फारतील डोळे

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drug case) अटकेत असलेल्या आर्यन खानच्या (aryan khan) सुटकेची प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण झाली. आर्यन तुरुंगातून बाहेर आला, त्यावेळी त्याला आणायला शाहरुख तिथे गेला नव्हता. शाहरुख (Shahrukh khan) वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये थांबला होता. आर्यनला आणण्यासाठी शाहरुखने त्याचा विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंहला पाठवले होते.

रवी आर्यनला कारमध्ये बसवून फोर सिझन हॉटेलमध्ये घेऊ गेला. तिथे पिता-पुत्राची भेट झाली. त्यानंतर दोघे मन्नतवर रवाना झाले. शाहरुखचा इतका ज्याच्यावर विश्वास आहे, तो रवी सिंह कोण आहे? ते जाणून घेऊया.

आर्यनला आणायला गेलेला रवी सिंह कोण आहे? पगार ऐकून विस्फारतील डोळे
रसिका सुनीलचा शुभविवाह! गोव्याच्या किनाऱ्यावर बांधली लग्नगाठ

शाहरुखच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा नेहमीच रवी सिंहचे नाव समोर येते. या रवी सिंहच्या पगाराचा आकडा ऐकूनच तुमचे डोळे विस्फारतील. रवी सिंह मागच्या दहा वर्षांपासून शाहरुखची सुरक्षा व्यवस्था संभाळत आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, रवी सिंह शाहरुखच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख आहे. त्याचे वार्षिक वेतन २.७ कोटी रुपये आहे.

आर्यनला आणायला गेलेला रवी सिंह कोण आहे? पगार ऐकून विस्फारतील डोळे
अखेर 'मन्नत' पूर्ण, आर्यन खान तुरुंगातून सुटला

रवी सिंहची जबाबदारी फक्त शाहरुख पुरती मर्यादीत नाहीय, तर तो संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा सांभाळतो. शाहरुख शिवाय आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान या तिघांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com