Shakira Row : ...अन्यथा शकिराला होणार ८ वर्षांचा तुरुंगवास अन् २१८ कोटींचा दंड! काय आहे प्रकरण?

जगप्रसिद्ध गायिका आणि डान्सर शकिरा ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.
Hips Don't Lie Singer Shakira Likely To Get 8 Years In Prison
Hips Don't Lie Singer Shakira Likely To Get 8 Years In Prison esakal

Hips Don't Lie Singer Shakira Likely To Get 8 Years In Prison : जगप्रसिद्ध गायिका आणि डान्सर शकिरा ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. टॅक्स प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी तिला कोर्टानं हजर राहण्याचे समन्स बजावले होते मात्र तिनं टाळाटाळ केल्यानं तिला मोठ्या प्रकरणाला सामोरं जावं लागलं आहे.

ग्लोबल पॉप स्टार शकिराच्या नावाची क्रेझ मोठी आहे. जगभरामध्ये तिचे चाहते मोठे आहेत. भारतातही शकिराचा चाहतावर्ग आहे. आपल्या गाण्यानं आणि नाचण्यानं शकिरानं मोठी ओळख निर्माण केली आहे. आजवर जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये शकिराचा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तिच्या नावाची चर्चा आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या कित्येक लाखांच्या घरात आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

अशा शकिराच्याबाबत एक न्यायालयीन वाद समोर आला असून तिनं वेळीच त्या गोष्टीची दखल न घेतल्यास तिला अटकेला सामोरं जावं लागेल. असेही सांगण्यात आले आहे. नेमकं काय आहे प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. इन्कम टॅक्स प्रकरणात शकिरानं फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. १४.५ मिलियनचे हे प्रकरण असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी बार्सिलोनामधील कोर्टात सुनावणी सुरु आहे.

एकाहून अधिक ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावावर करणाऱ्या शकिराच्या नावाची चर्चा २०१८ पासून सुरु झाली होती. यावेळी तिच्यावर चोरीचा आरोपही करण्यात आला होता. शकिरानं देखील आपल्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत ते खोटे असून त्यात आपल्याला अडकविण्यात आल्याचे तिनं म्हटले होते.

Hips Don't Lie Singer Shakira Likely To Get 8 Years In Prison
Tiger 3 Movie Review : 'सुतळी बॉम्ब' म्हणून पाहायला जाल, हाती येईल 'नागगोळी'! टायगरनं पुन्हा एकदा...

बार्सिलोना कोर्टातील सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, कोलंबियन गायिका शकिरा ही बराचकाळ स्पेनमध्ये राहायला होती. त्यामुळे तिनं इथं राहून जी कमाई केली त्यावरुन प्राप्तीकर भरणे अनिवार्य आहे. या देशातून तिनं मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. त्यामुळे ती कर भरण्यास पात्र आहे. अशावेळी तिनं त्या गोष्टीला नकार देणे चुकीचे आहे. असे संबंधित वकीलाचे म्हणणे आहे.

शकिरानं तिचं कार्यालय बहामास येथे सुरु केले आहे. कारण तिथं टॅक्स रेट हा स्पेनच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. शकिरानं वेळीच टॅक्स भरला नाही तर तिला आठ वर्षे आणि दोन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. किंवा २४ मिलियन युरोजचा दंडही तिला भरावा लागू शकतो. त्यामुळे शकिराची डोकेदुखी वाढली आहे. शकिरानं केवळ इंग्रजीच नाहीतर स्पॅनिश भाषेतून देखील गाण्यांची निर्मिती करुन नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com