डोक्यावर ड्रम घेऊन दारु आणायला निघाला शक्ति कपूर, पाहा व्हिडीओ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

शक्ति कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय.

कोरोना व्हायरसच्या भितीने देशभरातील लोकांना घरामध्ये बसून राहावे लागत आहे. पण सध्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सुट दिल्याने लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्व कलाकार घरामध्येच अडकून पडल्याने त्यांच्याकडून सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान बॉलिवुडचे दिग्गज अभिनेता शक्ति कपूर यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. 

अनुराग कश्यप बनला टिकटॉक स्टार, मुलीने शेअर केला डांन्सचा व्हिडीओ

शक्ति कपूर यांचा हा मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. व्हिडीओमध्ये शक्ति कपूर ड्रम डोक्यावर घेऊ जाताना दिसतात, मागून एख व्यक्ती कुठे जाताय म्हणून विचारतो त्यावर शक्ती कपूर यांनी मजेशीर उत्तर दिले आहे . त्यांनी भोळेपणाने सांगीतले की मी दारु आणण्यासाठी चाललो आहे. त्यानंतर ती व्यक्ती संपूर्ण सोसायटीसाठी दारु आणायला चाललात का? असा प्रश्न विचारते. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor) on

 

देशभरात अनलॉक 1 चे पहिले सत्र सुरु झाले असून त्यामध्ये मॉल, मंदिरे आणि दारूची दुकाने उघडण्याची परवाणगी देण्यात आली आहे. त्यामुळे शक्ति कपूर य़ा व्हिडीओमध्ये ड्रम डोक्यावर घेऊन दारु विकत आणण्यासाठी जात आहेत. शक्ति कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून व्हिडीओमध्ये शक्ति वेगळ्याच अंदाजामध्ये दिसत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shakti kapoor going to buy liquor in drum video viral on internet

Tags
टॉपिकस
Topic Tags: