अनुराग कश्यप बनला टिकटॉक स्टार, मुलीने शेअर केला डांन्सचा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

आलियाने कश्यपने दोघांचा हा टिक-टॉक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मुंबई: बॉलिवुडचा प्रसिध्द चित्रपट निर्माता अनुराग कश्यप हा त्याच्या वेगळ्या ढंगाच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण सध्या सोशल मिडीयावर अनुरागचा डान्स करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनुराग त्याची मुलगी आलिया कश्यप सोबत डान्स करताना दिसत आहे. आलियाने दोघांचा हा टिक-टॉक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

"अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणते.. मी नाही जाणार शूटिंगला !

आलिया तीच्यावडिलांना डान्सच्या स्टेप्स करुन दाखवत आहे आणि अनुराग त्या स्टेप्स करुन दाखवतोय, सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि लोक या व्हिडीओवरती भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. व्हिडीओत अनुराग मुलींच्या डान्स स्टेप्स तंतोतंत करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसतोय. दोगा बापलेकीची जोडी डान्स करताना खूपच गोड दिसत आहे. आलियाने “पप्पा जरा जास्तच एन्जॉय करतायेत”  असे कॅपशन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

@aaliyahkashyap

father is really enjoying himself ##fyp ##foryou ##dad

♬ original sound - millionairemindset2020

 

अनुराग कश्यप त्याच्या दर्जेदार चित्रपटांसोबतच त्याच्या बेधडक मत व्यक्त करण्यासाठी देखील प्रसिध्द आहे. सोशल मिडीयावर वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर अनुराग सतत व्यक्त होत सरकारच्या धोरणावर तो त्याचे स्पष्ट मत सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag kashyap daughter aaliya kashyap taught him dance tiktok video viral on internet