esakal | राज कुंद्राच्या अटकेनंतर झालेल्या ट्रोलिंगवर शमिताने सोडलं मौन
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra,shamita shetty

राज कुंद्राच्या अटकेनंतर झालेल्या ट्रोलिंगवर अखेर शमिताने सोडलं मौन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss 15 बिग बॉसचा १५ वा सिझन नुकताच सुरु झाला आहे आणि या सिझनमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीने Shamita Shetty सहभाग घेतला आहे. अलीकडेच पार पडलेल्या बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता दुसऱ्या क्रमांकावर होती. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाविषयी सांगितलं. शमिताची बहीण शिल्पा शेट्टीच्या पतीला त्यादरम्यानच मुंबई क्राइम ब्रांचने अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणी अटक केली होती. कुटुंबात एवढी मोठी घटना घडल्यानंतर शमिताने लगेच शोमध्ये भाग कसा घेतला, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून तिला ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं.

शमिता म्हणाली, "माझ्यासाठी ते सर्व खूप कठीण होतं, कारण तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. दुर्दैवाने माझा कोणताही दोष नसताना मला खूप ट्रोल केलं गेलं. माझ्या कुटुंबालाही त्या वेळी वाटले होत की अशा परिस्थितीत मी बिग बॉसच्या घरात असणेच माझ्यासाठी चांगले आहे. मी आधीच बिग बॉसची कमिटमेंट दिली होती आणि जे काही घडलं त्यामुळे मला माझी कमिटमेंट मोडायची इच्छा नव्हती. मला माझ्या शब्दावर टिकून राहायचं होतं. 'शो मस्ट गो ऑन' या नियमाप्रमाणे मी माझे निर्णय घेत गेली."

हेही वाचा: Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

"या कोविड काळात लोक काम नाही म्हणून घरी बसले आहेत. काहींनी त्यांच्या हातातील काम गमावलं. अशा वेळी जर मला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी पैसे दिले जात आहेत, तर मी नाही का म्हणू”, असा सवाल तिने केला. जवळपास दोन महिन्यांनंतर राज कुंद्राला जामीन मिळाला. "मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे", असं विधान शिल्पा शेट्टीने राजच्या अटकेनंतर केलं होतं.

loading image
go to top