संजय कपूरची मुलगी शनाया अडचणीत, पदार्पणातील सिनेमाच ठरतोय कारण Shanaya Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shanaya Kapoor's debut film Bedhadak lands in trouble,Read More

संजय कपूरची मुलगी शनाया अडचणीत, पदार्पणातील सिनेमाच ठरतोय कारण

संजय कपूरची मुलगी शनायाच्या(Shanaya Kapoor) बॉलीवूड(Bollywood Debut) पदार्पणाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहत होते. पण आता बातमी कानावर पडतेय की शनाया कपूरचा डेब्यू सिनेमा 'बेधडक'चं रिलीज पुढे ढकलण्यात आलं आहे. किंवा सिनेमाला बासनात गुंडाळलं असं देखील आपण म्हणू शकतो. सध्या तरी शनायाच्या बॉलीवूड पदार्पणला ब्रेक लागला असंच म्हणूया आपण.(Shanaya Kapoor's debut film Bedhadak lands in trouble,Read More)

हेही वाचा: Kapil Sharma Show: नवा सिझन,नवे कलाकार,जुन्यांची एक्झिट? काय आहे भानगड?

मार्च मध्ये करण जोहरने(Karan Johar) शनाया कपूरच्या ग्रॅंड बॉलीवूड डेब्यूची घोषणा केली होती. ट्रॅंगल लव्हस्टोरीत शनाया सोबत लक्ष्य आणि गुरफतेह पीरजादा मुख्य भूमिकेत होते. सिनेमा शशांक खेतान दिग्दर्शित करीत होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की, हा सिनेमा संकटात सापडला आहे. धर्मा प्रॉडक्शनने हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. अद्याप दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती लागलेली नाही. जर बातमी खरी असली तर 'बेधडक'ची अवस्था सुद्धा धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना २' आणि 'तख्त' सिनेमासारखी होताना दिसत आहे.

Shanaya Kapoor's debut film Bedhadak lands in trouble,Read More

Shanaya Kapoor's debut film Bedhadak lands in trouble,Read More

'बेधडक'च्या दिग्दर्शकाने धर्मा प्रॉडक्शनचे कितीतरी सिनेमे याआधी दिग्दर्शित केलेले आहेत. यामध्ये 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रिनाथ की दुल्हनिया','धडक' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. 'धडक' सिनेमातून शनायाची चुलत बहिण जान्हवी कपूरनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र शनाया तिच्या पदार्पणाच्या सिनेमामुळेच अडचणीत सापडली. 'बेधडक'च्या अनाऊंसमेंट सोबत सिनेमाचे पोस्टर्स देखील रिलीज केले गेले होते. तीन्ही अॅक्टर्सना पसंतही केलं गेलं होतं. शनायाच्या सौंदर्यावर भाळून तिचा असा चाहता वर्गही निर्माण झाला होता. शनाया अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे, आणि तिच्या आईचं नाव महीप कपूर आहे.

हेही वाचा: Koffee with Karan7: केदारनाथला गेलेल्या सारा,जान्हवीचा मृत्यूशी सामना

'बेधडक' मधील अभिनेता लक्ष्य आधी करण जोहरच्या 'दोस्ताना २' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता. परंतु 'दोस्ताना २' हा प्रोजेक्ट पुढे ढकलल्यानंतर 'बेधडक' सिनेमात त्याला संधी दिली गेली. पण या देखील सिनेमाचं भविष्य अधांतरीतच आहे. गुरफतेहने नेटफ्लिक्सच्या 'गिल्टी' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीच पदार्पण केलं आहे. पण 'बेधडक' त्याच्यासाठी मोठा लॉंच होता. आता सर्वांच लक्ष 'बेधडक'च्या निर्मात्यांवर आहे की नेमकी कोणती अंतिम घोषणा त्यांच्याकडून होत आहे.

Web Title: Shanaya Kapoors Debut Film Bedhadak Lands In Troubleread

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..