Koffee with Karan7: केदारनाथला गेलेल्या सारा,जान्हवीचा मृत्यूशी सामना

करण जोहरच्या 'Koffee With Karan 7' मध्ये साराआणि जान्हवीने करिअर,पर्सनल लाइफ, फ्रेंडशीप गोल अशा अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at Kedarnath
Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at KedarnathSakal

करण जोहरच्या(Karan Johar) 'कॉफी विथ करण ७' मध्ये सारा अली खान(Sara ali khan) आणि जान्हवी कपूरच्या(Janhvi Kapoor) एन्ट्रीने चारचॉंद लावले आहेत. दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी एकत्र केदारनाथ(Kedarnath) ट्रिप देखील केली आहे. पण या त्यांच्या ट्रिप दरम्यान त्यांच्यासोबत असं काही घडलं की त्या आजतागायत तो प्रसंग विसरलेल्या नाहीत. दोघींनीही जवळजवळ मृत्यूला कवटाळलं होतं आणि मरता मरता त्या वाचल्या होत्या असं म्हणूया हवंतर. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं.(Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at Kedarnath)

जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' च्या शो मध्ये त्यांच्या केदारनाथ ट्रिप विषयी खुलासा केला आहे. दोघी काही महिन्याआधी केदारनाथला फिरायला गेल्या होत्या. तिथे दोघी एका उंच खडकावर चढाई करताना मध्येच फसल्या होत्या. तेव्हा दोघीही त्या खडकावरनं जवळ-जवळ खाली पडणार होत्या. केदारनाथच्या मायनस ७ डिग्री सेल्सियसच्या तापमानात त्या दोघींचा जवळ-जवळ बर्फ झाला होता असं देखील त्यांनी त्यावेळी नमूद केलं.

टकॉफी विथ करण ७ट मध्ये आल्यावर सारा अली खान त्या भयानक प्रसंगाविषयी सांगताना म्हणाली की,''आम्ही भैरवनाथ जायचा निर्णय घेतला. तिथे चालत जाण्यासाठी एक नॉर्मल रस्ता देखील होता,पण आम्ही स्वतःला जरा जास्तच शूरवीरांगणा समजत होतो. त्यामुळे आम्ही हाइक करत जाण्याचा पर्याय निवडला. तिथे खूपच उंचच उंच खडक होते. आणि जान्हवीनं एक वाट निवडली आणि म्हणाली,चल आपण इथनं चढूया. मी खरंतर घाबरली होती पण मला वाटलं उगाच मी भीती दाखवली तर तिच्या उत्साहावर पाणी पडायचं''. साराला माहीत होतं की तिथे चढाई करताना खूप बारीक-बारीक खडक पायाखालून निसटून जात होते. आणि त्यामुळे पडायची भीती होती.

Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at Kedarnath
Kapil Sharma Show: नवा सिझन,नवे कलाकार,जुन्यांची एक्झिट? काय आहे भानगड?

जान्हवी आणि सारा अली खान म्हणाल्या,''आम्ही अर्ध्यावर आलो अन् जवळ-जवळ फसलोच,मार्ग सापडत नव्हता. ना वर जाऊ शकत होतो,ना खाली. तेवढ्यात आम्हाला एक माणूस भेटला. आम्ही खूश होऊन त्याच्याकडे मदत मागितली. पण तो आमचा चाहता निघाला आणि त्याला फक्त आमच्यासोबत सेल्फी काढायचा होता''. शेवटी अर्धा तास तिथे अडकून पडल्यानंतर साराच्या ड्रायव्हरने स्पेशल फोर्सच्या मदतीनं त्या दोघींचे प्राण वाचवले.

Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at Kedarnath
KBC Facts: नाकापेक्षा मोती जड,अमिताभच्या कपड्यांचा खर्च ऐकून फिरतील डोळे

जान्हवी कपूर पुढे म्हणाली,''केदारनाथमध्ये आमच्या अडचणी थांबायचं नावच घेत नव्हत्या. साराने ६ हजार रुपये वाचवण्यासाठी रुममध्ये हिटरची सोय नसलेलं स्वस्त हॉटेल बूक केलं होतं. पण त्यामुळे आम्ही दोघीही थंडीनं गारठल्या होतो. मी एक थर्मल,एक पफर जॅकेट,तीन शाल,दोन ट्रॅक पॅंट आणि दोन स्वेटर अंगात घातले होते. आणि एवढं सगळं घालूनही मी थरथर कापत होतो.

Koffee With Karan 7: Sara Ali Khan and Janhvi Kapoor recall near-death experiences at Kedarnath
'अंगावर कपडे नाहीच,फक्त अजगर',न्यूड फोटोशूट वर मधू सप्रेच्या उत्तराचा कहर

जान्हवी आणि सारानं करणच्या या शो मध्ये येऊन अनेक किस्से शेअर केले. १४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा एपिसोड स्ट्रिम केला जाईल. पहिल्या भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आले होते,त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याविषयी खूप खुलासे केले. पुढील भागांमध्ये अक्षय कुमारपासून गौरी खान पर्यंत अनेक बडे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत करणच्या 'Koffee With Karan 7' या शो मध्ये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com