शरद केळकर आणि किशोर कदम एकत्र, 'ऑपरेशन रोमिओ' मध्ये महत्वाच्या भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad kelkar and kishor kadam

शरद केळकर आणि किशोर कदम एकत्र, 'ऑपरेशन रोमिओ'मध्ये महत्वाच्या भूमिका

bollywood news : मराठी रसिकांसाठी बॉलिवूड मधील 'आपला चेहरा' बनलेला अभिनेता शरद केळकर (sharad kelkar) आणि एक सृजनशील, संवेदनशील अभिनेता, दिग्गज कवी अशी ओळख असलेला किशोर कदम (kishor kadam) असे दोन महत्वाचे कलाकार प्रथमच एकत्र दिसणार आहेत. 'तानाजी' आणि 'लक्ष्मी' या चित्रपटांमधून शरद केळकर याने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. भूमिकेची उत्तम समज आणि दर्जेदार अभिनयामुळे त्याने बॉलिवूड मध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा: आर के हाऊसमध्ये रणबीर आलिया घेणार सात फेरे,माहीती झाली उघड..

शरद याने छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. 'आक्रोश' या मालिकेतून पदार्पण करून 'सात फेरे', 'बैरी पिया', 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. पुढे त्याने चित्रपट विश्वातही आपली मोहर उमटवली. 'एविल रिटर्न्स', 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-४' अशा दमदार चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. लवकरच तो 'ऑपरेशन रेमियो' या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत किशोर कदमही असणार आहे. मराठीतील दोन आघाडीचे आणि लोकप्रिय कलाकार पहिल्यांदाच एकत्र आल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही महत्वाच्या भूमिकांमध्ये पाहता येणार आहे.

हेही वाचा: Fraud Alert: पॅन कार्डचा गैरवापर करून अभिनेता राजकुमार रावला गंडा

‘ऑपरेशन रोमियो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन शशांत शाह यांनी केले आहे. या चित्रपटात शरद केळकर आणि किशोर कदम यांनी पोलिसांची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजतो आहे. अद्याप कथानक उघड झाले नसले तरी ट्रेलवरून हे खलनायकी पद्धतीचे पात्र साकारत असल्याचे दिसून येते.

'टॉयलेट-एक प्रेम कथा', 'रुस्तम' आणि 'नाम शबाना' यांसारख्या अभूतपूर्व चित्रपटांनंतर 'फ्रायडे फिल्मवर्क्स' आणि 'रिलायन्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन'चा 'ऑपरेशन रोमियो' हा सहावा चित्रपट आहे. नीरज पांडे आणि शितल भाटिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. नीरज पांडे यांनी याआधी 'ए वेन्सड़े', 'स्पेशल 26', 'एमएस' धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'स्पेशल ऑप्स' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Web Title: Sharad Kelkar And Kishor Kadam New Film Operation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..