Sharad Kelkar: छत्रपतींच्या भूमिकेपर्यंत पोहोचणं सोप्पं नव्हतं,शरद केळकरचा स्ट्रगल बघाच

मालिका, चित्रपट ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरचा आज वाढदिवस..
Sharad Kelkar birthday : his serial, movies, struggle, lifestyle
Sharad Kelkar birthday : his serial, movies, struggle, lifestyle sakal

Sharad Kelkar: आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून शरद केळकरचे नाव घ्यावं लागेल. त्यानं केवळ बॉलीवूडमध्ये काम केलं आहे असं नाही तर वेगवेगळ्या चित्रपटांमध्येही त्यानं भूमिका केल्या आहेत. त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. सध्याच्या घड़ीला तो आघाडीचा अभिनेताही आहे. आज अभिनेता म्हणून मान मिळवणारा शरद केळकर एकेकाळी ट्रेनर होता, मग मालिका आणि त्यानंतर चित्रपट असा बराच संघर्ष त्याने केला आहे. त्याने सकारलेले 'तान्हाजी' चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आजही रुंजी घालत आहेत. पण इथपर्यंत पोहोचणं शरद साठी सोप्पं नव्हतं. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची स्ट्रगल स्टोरी..

अभिनेता शरद केळकर मूळचा प्रदेशातील ग्वाल्हेरचा. लहान वयातच त्याचे वडील गेल्याने संघर्ष सुरुवातीपासूनच त्याच्या नशिबी आला. वडिलांनंतर आई आणि बहिणीने शरदला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप पाठिंबा दिला.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ शरद फिजिकल ट्रेनर म्हणून काम करत होता.

तो कदाचित अभिनयाकडे वळला देखील नसता पण त्याच्यासोबत एक किस्सा घडला आणि तो इथे आला. 2002 मध्ये तो एका मित्राला भेटण्यासाठी मुंबईला आला होता. या दरम्यान त्याला ग्रासिम मिस्टर इंडिया इव्हेंटची माहिती मिळाली. शरदलाही याची उत्सुकता वाटली आणि तो या कार्यक्रमात सहभागी झाला. या स्पर्धेदरम्यान काही प्रायोजकांची नजर शरदवर पडली आणि त्याच्यासाठी मनोरंजन विश्वाचे दार खुले झाले. त्याला एका मालिकेसाठी विचारण्यात आले आणि त्याचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले.

शरदने दूरदर्शनच्या 'आक्रोश' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘सीआयडी’, ‘उतरन’, ‘रात होने को है’ आणि अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला. मालिकांव्यतिरिक्त अनेक रिअॅलिटी शो देखील त्याने होस्ट केले. यामध्ये 'रॉक-अँड-रोल', 'सारेगामापा चॅलेंज', 'पती-पत्नी और वो’ यासारखे हीट शो आहेत. तर ‘नच बलिए 2’मध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

एकीकडे शरद छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत होता, तर दुसरीकडे त्याला चित्रपटांमध्येही भरपूर काम मिळत होते. 2004मध्ये ‘हसल’मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर तो 'अ पेइंग घोस्ट', 'मोहेंजो दारो', 'रॉकी हँडसम', 'सरदार गब्बर सिंह', 'गेस्ट इन लंडन', 'राक्षस', 'भूमी', 'बादशाहो' आणि ‘तान्हाजी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला. त्याणए साकारलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि 'लक्ष्मी' लोकांच्या विशेष पसंतीस उतरले. केवळ चित्रपटच नाही तर आपल्या दमदार आवाजाने त्याने डबिंग क्षेत्रही गाजवले आहे. ‘बाहुबली’ चित्रपटातील अमरेंद्र बाहुबली या व्यक्तिरेखेला त्यानेच आवाज दिला होता. सध्या त्याचे अनेक आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत असून लवकरच तो मुख्य भूमिकेत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com