Shark Tank 2 India 2 Anupam Mittal comment
Shark Tank 2 India 2 Anupam Mittal comment esakal

Shark Tank 2 : 'माकडाला काय माहिती की...' शार्क टँकच्या जजेसमध्ये जुंपली!

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या वेगळ्या सादरीकऱणामुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय असलेल्या शार्क टँक २ ची मोठी हवा आहे.

Shark Tank 2 India 2 Anupam Mittal comment : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या वेगळ्या सादरीकऱणामुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय असलेल्या शार्क टँक २ ची मोठी हवा आहे. या रियॅलिटी शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता तर दुसऱ्या सीझननं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शार्क टँकमधील जजेस हे प्रेक्षकांच्या चर्चेचा, गप्पांचा खास विषय असतो. बऱ्याचदा शार्क टँकमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांवर प्रतिक्रिया देताना जजेसमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपासून शार्क टँकचे अनुपम मित्तल आणि नमिता थापर यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून आले आहे.त्यामध्ये अनुपमनं नमिताला जे शब्द वापरले त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Also Read -कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शार्क टँकमध्ये अमित जैन, पियुष बन्सल, विनिता सिंग हे जजेस आहेत. यासगळ्यात अनुपम आणि नमिता चर्चेत आले आहेत. नव्या सीझनच्या एका इपिसोडमध्ये आईस क्यूब विकणाऱ्या एका कंपनीसोबत डील करताना एकमेकांशी कशाप्रकारे भांडले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कंपनीच्या नवउद्योजकांनी जजेसला प्रेझेंटेशन दिल्यानंतर त्यांचे बोलणे ऐकून प्रभावीत झाले होते. मात्र नमिताचे म्हणणे थोडेसे वेगळे होते. तिनं त्यांना काही प्रश्न विचारले होते. तुम्ही जो बर्फ तयार करता तो तुमच्या राज्यात देखील वापरता का, असा एक प्रश्न होता.

Shark Tank 2 India 2 Anupam Mittal comment
Viral Video : मास्टरशेफ शोमध्ये दुकानातून बिर्याणी घेऊन आली, परिक्षक म्हणाले, बाहेर निघ!

त्यावर पियुषनं ते कॉकटेल्स, मॉकटेल्समध्ये अशाप्रकारचे आईस क्यूब वापरले जातात. असे सांगितले. हे सगळं अनुपमनं ऐकल्यानंतर त्यानं नमिताला प्रत्युत्तर केलं. तो म्हणाला, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद? हे ऐकल्यानंतर मात्र नमिताला राग आला. तिनं त्याबद्दल अनुपमला विचारलं. शार्क टँकच्या आगामी एपिसोडचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Shark Tank 2 India 2 Anupam Mittal comment
Akshay Kumar : 'कुणाच्या वाईट दिवसांची थट्टा उडवू नका', एकता कपूरनं अक्षयची केली पाठराखण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com