
Shark Tank India 2: 'लोकांनी खूप त्रास दिला, वैयक्तिक आयुष्यात केली ढवळाढवळ! तरीही...' पियुषचा मोठा निर्णय
Shark Tank India 2: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय असलेल्या शार्क टँकच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर या रियॅलिटी शो वरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देत असतात. सध्या एका गोष्टीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
देशातील नवउद्योजकांना आणि त्यांच्या कल्पनांना संधी देणाऱ्या शार्क टँकची सगळीकडे चर्चा आहे. आता त्याचा दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लेन्सकार्टचे संस्थापक पियुष बन्सल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते यापुढे त्या शो चे जज असणार नाहीत. त्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
Also Read- क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
पियुष यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला आहे. शार्क टँकने मोठी ओळख दिली. त्यातून लाखो लोकांपर्यत पोहचता आले. आपल्या देशामध्ये टँलेंटची काही कमी नाही हे त्यामुळे कळले. मात्र हे सगळे होताना मला वैयक्तिक पातळीवर काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. यामुळे मी मोठा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. मला लोकांनी सर्वसामान्यपणे जगू द्यावे.
हेही वाचा: Shah Rukh Khan: एसआरके छक्का.. म्हणणाऱ्याला शाहरूख खानने दिलं सडेतोड उत्तर ..
पीयुष यांचे म्हणणे आहे की, मला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ती एका अर्थानं सुखावणारी बाब असली तरी दुसरीकडे त्याचा मोठा तोटा झाला आहे. लोकं माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसू लागले आहेत. त्यामुळे मला या शोमध्ये पुन्हा यायचे नाही. प्रमाणापेक्षा वाढलेली फॉलोअर्सची संख्या हे त्याामागील प्रमुख कारण आहे.
हेही वाचा: Viral Video : नाद खुळा! काय ती नवरी अन् काय ते वादन... एकदम ओक्केच
पियुष यांना शार्क टँकच्या पहिल्या सीझनमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली होती. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात, लोकांनी मला सुखानं जगू द्यावे. वाढते फॉलोअर्सही माझ्यासाठी मोठी डोकेदुखी आहे. पण मी पुन्हा लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठीची जी चमक पाहतो त्यामुळे मला माझा निर्णय पुन्हा मागे घ्यावा लागतो हेही आग्रहानं सांगावे लागेल. असेही त्यांनी म्हटले आहे.