esakal | मालिकांची शीर्षकगीतं ऐकायला आवडतात? मग हा व्हिडीओ नक्की पाहा

बोलून बातमी शोधा

shashank ketkar}

अनेकदा या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात पण वर्षानुवर्षे त्यांची शीर्षकगीतं प्रेक्षकांच्या ओठी तशीच असतात.

मालिकांची शीर्षकगीतं ऐकायला आवडतात? मग हा व्हिडीओ नक्की पाहा
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

म्युझिक अल्बम आणि चित्रपटांसोबतच काही मालिकांची शीर्षकगीतं रसिकांचं लक्ष वेधून घेतात. अनेकदा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात पण वर्षानुवर्षे त्यांची शीर्षकगीतं प्रेक्षकांच्या ओठी तशीच असतात. मराठीतील अनेक मालिकांची शीर्षकगीतं आजवर गाजली. त्यातच आता आणखी एका शीर्षकगीताची भर पडली आहे. झी मराठी वाहिनीवर 'पाहिले न मी तुला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी या मालिकेचं शीर्षकगीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अभिनेता शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या मालिकेचं शीर्षकगीत आनंदी जोशीने गायलं असून वैभव जोशींनी गीत लिहिलं आहे. तर समीर सप्तिस्कर यांनी संगीतबद्ध केलंय. सोशल मीडियावर या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर हे गाणं कसं संगीतबद्ध झालंय, त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

हेही वाचा : शशांक केतकर ते धनश्री कडगावकर.. या मराठी कलाकारांच्या घरी हलला पाळणा

या मालिकेत शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत मालिकेत तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत. शशांकने याआधी मालिकेचा प्रोमो शेअर करत, 'आता कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे', असं म्हटलं होतं. या भूमिकेबद्दल त्याने आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांचे आभारही मानले होते. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.