esakal | दिलीप कुमार यांना भारतरत्न का नाही ? शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

dilip kumar and dharmendra shatrughana sinha

दिलीप कुमार यांना भारतरत्न का नाही ? शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रश्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई: ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले त्या प्रतिभावान दिलीप कुमार (dilip kumar) यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आता त्यांच्या निधनानंतर एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती म्हणजे त्यांना अजूनपर्यत भारतरत्न पुरस्कारानं (bharat ratna) का गौरविण्यात आले नाही. असा सवाल बॉलीवूडमधल्या (bollywood) एका ज्येष्ठ अभिनेत्यानं उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वयाच्या 98 व्या वर्षी दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. (shatrughan sinha reaction on dilip kumar why legend actor not get bharat ratna)

एकीकडे दिलीप कुमार यांच्यासोबत काम करणारे अभिनेते त्यांना आदरांजली वाहत असताना दुसरीकडे त्यांना भारतरत्न का मिळाला नाही. असा सवाल ज्येष्ठ अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha ) यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. पाकिस्तानमध्येही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाकिस्तानातील पेशावर येथे त्यांचा जन्म झाला होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे. वास्तविक दिलीप कुमार यांना आतापर्यत वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या भारतरत्नने सन्मानित करण्यात आले नाही. असे मत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. केवळ अभिनयापुरतीच दिलीप कुमार यांची ओळख नव्हती तर त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासंबंधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्टिट केले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलिप कुमार यांच्या सोबत क्रांती या चित्रपटात काम केले होते. त्यांनी त्यावेळच्या काही आठवणींना उजाळाही दिला. मीडिया रिपोर्टस नुसार शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, अनेक लोकं इंडस्ट्रीमध्ये येतात आणि जातात मात्र दिलीप कुमार यांची गोष्ट काही और होती. त्यांच्यासारखा अभिनेता पुन्हा होणे नाही. मी त्यांची कोणाशी तुलना करत नाही. मात्र एवढं सांगतो की, त्यांना भारतरत्न मिळायला हवे होते. अजूनपर्यत त्यांचा भारतरत्नसाठी विचार का केला गेला नाही, याचे मला आश्चर्य वाटते. असेही सिन्हा यांनी सांगितले.

हेही वाचा: आता उरल्या फक्त आठवणी.. दिलीप कुमार यांना शेवटचं बिलगून रडल्या सायरा बानो

हेही वाचा: 'आयर्न मॅनच्या' वडिलांचं निधन, 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिलीप कुमार यांना मिळालेल्या अॅवॉर्डविषयी सांगायचे झाल्यास, त्यांना फिल्म फेयरचा पहिला अॅवॉर्ड मिळाला होता. 1991 मध्ये पद्मविभूषण तर 2015 मध्ये देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. पाकिस्ताननं त्यांच्या देशातील निशाण ए पाकिस्तान या पुरस्कारानं दिलीप कुमार यांना सन्मानित केले होते.

loading image