शहनाझ गिल नाराज; सलमानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा सोडण्याचा निर्णय? salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill May Opt Out Of Salman Khan’s Kabhi Eid Kabhi Diwali

शहनाझ गिल नाराज; सलमानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा सोडण्याचा निर्णय?

सलमान खानचा(Salman Khan) सिनेमा 'कभी ईद,कभी दिवाली'(Kabhi Eid,Kabhi Diwali) सध्या खूपच चर्चेत आहे. आयत्या क्षणी सिनेमात कलाकारांच्या अदला-बदलीचं नाट्य घडून येत आहे त्यामुळे चाहते मात्र पुरते हैराण झाले आहेत. आयुष शर्मा आणि जहीर इकबालनंतर आता बातमी आहे की पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शेहनाझ गिल(Shehnaaz Gill) देखील सिनेमाला टाटा-बाय बाय करण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा: सोलापूरचा मराठी दिग्दर्शक करण जोहरसोबत करतोय काम; कोण आहे अक्षय इंडीकर?

एका वेबसाइटला मिळालेल्या माहितीनुसार शहनाझ गिल या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. पण सध्या ती देखील नाराज झालीय असं कळत आहे. सिनेमासंदर्भात जे मोठमोठे बदल होत आहेत त्याविषयी शहनाझला कल्पना नाही. बातमी अशीहीआहे की शहनाझ हा सिनेमा करायचा की नाही याविषयी पुर्नविचार करीत आहे. प्रदर्शनाआधीच सिनेमाला जी निगेटिव्ह पब्लिसिटी मिळत आहे यामुळे शहनाझ दुखावली आहे. सलमानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा होणार की नाही याबाबतीत सध्या क्रिटिक्सही चुप्पी साधून आहेत.

हेही वाचा: Photo: करण जोहरच्या पन्नासाव्या वाढदिवसाची पार्टी; फोटो पाहिलेत का?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार,शहनाझ गिलला सलमानवर पूर्ण विश्वास आहे. सलमान खानने शहनाझ गिलला शांत रहायचा,आणि नकारात्मक विचारांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे. शहनाझही या सिनेमातील भूमिकेसाठी जोरदार तयारी करीत आहे. तिला आपल्या चाहत्यांना अभिनयाच्या माध्यमातून खूश करायचं आहे. आपल्या भाषेवर,तिच्या लेहेजावर देखील ती मेहनत घेत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: शाहरुख-अजयला कुणी पाठवली 5-5 रुपयाची मनी ऑर्डर? कारणही ऐकाल तर व्हाल थक्क

आता सलमान खानने शहनाझला समजावलं आहे की,शहनाझला स्वतःला वेळ द्यायला हवा. सिनेमाविषयी ज्या नकारात्मक गोष्टी तिच्या कानावर पडत आहेत त्याकडे तिने दुर्लक्ष करावं. सलमान खानची बहिण अर्पिता शर्मा-खाननं दिलेल्या ईद पार्टित शहनाझ गिल आणि सलमान मधील जवळीकता सर्वांनीच पाहिली. यावरनं अनेक चर्चाही रंगल्या. पण बोललं जात आहे की सलमाननं शहनाझला बॉलीवूडमध्ये सेटल करण्याचं ठरवलं आहे. शहनाझ आता बॉलीवूड पदार्पणानंतर काय धमाल आणते हे वेळच सांगेल. तोपर्यंत चाहत्यांच्या हातात वाट पाहणं इतकंच उरलं आहे.

Web Title: Shehnaaz Gill May Opt Out Of Salman Khans Kabhi Eid Kabhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top