'बिग बॉस 15' च्या फिनालेत शहनाझ सांगणार सिद्धार्थची 'ती' खास आठवण

दिवंगत अभिनेत्याला त्याच्या मैत्रिणीकडून अशी असेल हृ्द्यस्पर्शी श्रद्धांजली
Shehnaaz Gill and Sidharth Shukla met on Bigg Boss 13.
Shehnaaz Gill and Sidharth Shukla met on Bigg Boss 13.Google

हिंदी 'बिग बॉस सिझन 15' चा फिनाले येत्या शनिवारी व रविवारी पार पडणार आहे. यंदाचा हा सिझन दरवेळेप्रमाणे वादांमुळे चर्चेत राहिला खरा. पण अभिजित बिचुकले सलमानला टार्गेट करीत जे काही बरळत सुटला आहे ते मात्र बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. आजपर्यंत सलमानच्या विरोधात कोणत्याच स्पर्धकानं असं भाष्य केलं नव्हतं. मात्र या सगळ्या विरोधातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत बिग बॉसच्या फिनालेची मात्र जोरदार तयारी सुरू आहे. फिनालेचा भाग रंगणार आहे तो दिवंगत सिद्धार्थ शुक्लाच्या(Sidharth Shukla) आठवणींना उजाळा देऊन. या विशेष भागासाठी सिद्धार्थची कथित गर्लफ्रेंड म्हणून जिला ओळखलं जातं किंवा जायचं त्या शहनाझ गिलची (Shehnaaz Gil)उपस्थिती लक्षणीय ठरेल. या भागात शहनाझ सिद्धार्थसाठीच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करीत त्याला श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

या फिनालेच्या भागाच्या प्रमोशनासाठी वाहिनीनं 'सिदनाझ' चे काही आधीचे व्हिडीओ एकत्रित करून एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्या प्रोमोमध्ये शहनाझचा आवाज ऐकायला येत आहे. ती म्हणतेय,''आजही मी कुणाशी भांडेन किंवा कुणाची समजूत काढेन तेव्हा मला तुझी आठवण येईल. या फिनालेच्या भागात सिद्धार्थच्या काही खास आठवणींना शहनाझ उजाळा देणार आहे. 'बिग बॉस सिझन 13' च्या भागात सिद्धार्थ-शहनाझ एकत्र स्पर्धक म्हणून सामिल झाले होते. पण त्यांच्यात खुललेली मैत्री सगळ्यांनीच पाहिली. सिद्धार्थच्या अचानक मृत्यूनंतर शहनाझ गिलची झालेली अवस्था कोणापासून लपून राहिलेली नाही. भले त्या दोघांनी त्या नात्याला मैत्रीचं नाव दिलं होतं पण त्यांच्या चाहत्यांनी मात्र त्यांना एकमेकांचे जोडीदार म्हणून कधीच पसंद केलं होतं. ते आता प्रत्यक्षात पूर्ण होणार नसलं तरी शहनाझ मात्र आजही एक मित्र म्हणून सिद्धार्थ आपल्या कायम जवळ असेल. त्याने मला जे शिकवलंय ते मी कधीच विसरणार नाही,असे कायम त्याच्या आठवणीत म्हणत असते. आता फिनालेत शहनाझ सिद्धार्थविषयी कशी व्यक्त होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com