Shehzada Twitter Review: 'शहजादा' हिट की फ्लॉप!, काय म्हणतायत लोक? Kartik Aaryan Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehzada Twitte Review

Shehzada Twitter Review: 'शहजादा' हिट की फ्लॉप!, काय म्हणतायत लोक?

Shehzada Twitter Review: रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' रिलीज झाला आहे. 'शहजादा' मध्ये कार्तिक आर्यन,कृति सनन यांची रोमॅंटिक लव्हस्टोरी लोकांना पहायला मिळणार आहे.

सोशल मीडियावर सिनेमा रिलीज झाल्या झाल्या 'शहजादा'चे रिव्ह्यू यायला लागले आहेत. काही ट्वीटर टुजर्सनी सिनेमाला 5 स्टार दिले आहेत तर सिनेमा पूर्ण कॉपी केला गेलाय असं काहींनी म्हटलं आहे.

चला जाणून घेऊया काय म्हणतोय ट्वीटर युजर्सचा रिव्ह्यू..

शहजादा आहे अला वैकुंठपुरमल्लो सिनेमाचा रीमेक

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनन यांच्यासोबत 'शहजादा' सिनेमात परेश रावव,रोनित रॉय,सनी हिंदुजा आणि मनिषा कोईराला यांच्यादेखील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. हा सिनेमा अल्लू अर्जूनचा 'अली वैकुंठपुरमल्लो' सिनेमाचा रीमेक आहे. या सिनेमात अल्लू सोबत पूजा हेगडे मु्ख्य भूमिकेत होती. सिनेमाच नाही तर यातील गाणी देखील सुपरहिट झाली होती,

तसंच,आता 'शहजादा' सिनेमातील गाणीही हिट झालेली पहायला मिळाली. त्यामुळे ट्रेड अॅनलिस्टना 'शहजादा' कडूनही अपेक्षा आहेत.

कार्तिक आर्यन 'शहजादा' सिनेमाच प्रमोशन गेल्या अनेक दिवसांपासून करताना दिसत होता. गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी 'शहजादा' सिनेमाचा ट्रेलर जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला होता,ज्याला पाहून कार्तिक आर्यनला आकाश ठेंगणं झालेलं दिसत होतं.

'शहजादा' सिनेमाचं दिग्दर्शन रोहित धवननं केलं आहे. संगीत प्रीतमनं दिलंय तर भूषण कुमार,अल्लू अरविंद,अमन गिल यांच्यासोबत स्वतः कार्तिक आर्यननं देखील सिनेमाची निर्मिती केली आहे.

ट्वीटरवर 'शहजादा' ज्या पद्धतीनं ट्रेऩ्ड होताना दिसत आहे त्यावरनं तरी दिसत आहे की 'शहजादा' लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की..'हा माणूस आता थांबणार नाही..' कार्तिकनं पुन्हा करून दाखवलं.

तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे-'शहजादा एक मजेदार सिनेमा आहे..मला डाऊट होता की कार्तिक आर्यन अल्लू अर्जूनची भूमिका साकारत आहे,तर तो पूर्ण न्याय देऊ शकेल का पण त्यानं खूप छान काम केलं आहे'.

सोशल मीडियावर आणखी एकानं लिहिलं आहे की-'एंटरटेन्मेंटचा विचार केला तर 'शहजादा'पेक्षा चांगला सिनेमा असूच शकत नाही'.

तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे की-'शहजादा ड्रामा,कॉमेडी आणि रोमान्सनी खचाखच भरलेला सिनेमा आहे. एक टोटल फॅमिली एंटरटेनर. यात कार्तिक आर्यन, परेश रावल,क्रिती सनन यांची जबरदस्त अॅक्टिंग आहे'.

रिलीज नंतर काहीच तासात शहजादा सिनेमा पायरसीचा शिकार झालेला दिसून आलंय. सिनेमा ऑनलाइन लीक झाला असून टेलीग्राम,तमिळ रॉकर्ससोबत इतर काही साइट्सवर एचडी प्रिंटमध्ये उपलब्ध आहे.