मड आयलंडमधील 'राज' बाहेर, अभिनेत्री पीडितेनं सांगितली व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

मड आयलंडमधील 'राज' बाहेर, अभिनेत्री पीडितेनं सांगितली व्यथा

मुंबई - बॉलीवूड (bollywood) सध्या एका वेगळ्या प्रकरणाला सामोरं जातं आहे. ते म्हणजे राज कुंद्रा (raj kundra) आणि त्याचं पॉर्न व्हिडिओ (porn video) शुट करणं. यामुळे त्याला पोलीसाच्या चौकशीचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्याच्यावर आरोपही केले आहे. काल सेबीनं त्याला आणि पत्नी शिल्पा शेट्टीला तीन लाखांचा दंड केला. त्यापूर्वी उच्च न्यायालयानं त्याला जामीन नाकारला. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मड़ आयलंडची. एका अभिनेत्रीनं त्या बंगल्यात काय चालायचं याचा खुलासा केला आहे. (victim reveals truth of madh island bungalow says rowa khan makes nude films by trapping yst88)

पुढील वर्षांपर्यत राजला त्या व्हिडिओच्या माध्यमातून 34 कोटी रुपये कमावयचे होते. अशी माहिती सोशल मीडियातून समोर आली होती. राजसहित आणखी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणावर अनेक अभिनेत्रींनी आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नको त्या प्रकारचे व्हिडिओ शुट करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप राजवर केला आहे. त्यात शर्लिन चोप्रा, पुनम पांडे सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. राजनं आपल्याला त्या व्हिडिओ बाबत ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले होते.

आता एका पीडित मॉडेलनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिनं सांगितलं, आपला विश्वास संपादन करुन मड आयलंडच्या बंगल्यावर आपल्याला नेण्यात आलं. त्यानंतर तिला एक स्क्रिप्टही देण्यात आली. आणि किनाऱ्यावर हॉट फोटोशुट करण्यास सांगितले. जेव्हा तिनं हे सगळं करण्यास नकार दिला तेव्हा तिला धमकीही देण्यात आली. त्या पीडित मॉडेलचे वय 25 वर्षे आहे. आणि तिनं मराठी, भोजपुरी चित्रपटात कामही केले होते. ती 2018 मध्ये रौनक नावाच्या एका दिग्दर्शकाला भेटली होती. त्यानं तिला एका चित्रपटात काम देणार असल्याचे सांगितले होते.

2 फेब्रुवारी 2021 रोजी त्या दिग्दर्शकानं आपल्याला मलाड मध्ये भेटण्यास सांगितले. रोनक आणि रोआ खान तिथे त्यांच्या कारनं आले. आणि मला ते मड आयलंडवर घेऊन गेले. तिथल्या ग्रीन पार्क बंगल्यामध्ये आम्ही थांबलो होतो. मला सांगण्यात आले की, तुला 25 हजार रुपये देण्यात येतील. त्याबदल्यात जी स्क्रिप्ट दिली जाईल ती वाचून त्यावर काम करावे लागेल. त्या स्क्रिप्टचे नाव सिंगल मदर असे होते.

हेही वाचा: राज-शिल्पाची आर्थिक कोंडी? 'सेबी'नं ठोठावला मोठा दंड

हेही वाचा: ऑन स्क्रीन : १४ फेरे : लांबलेली लग्नघटिका

त्यानंतर मला बर्तनवाली नावाची स्क्रिप्ट देण्यात आली. मला ती अतिशय घाणेरडी वाटली. मी सांगितले की, मला त्यात काम करायचे नाही. त्यावर मला असे सांगण्यात आले, ही फिल्म अनेकांना पाहता येणार नाही. याचे कारण म्हणजे ती ज्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे तिथे पैसे मोजावे लागणार आहे. अशाप्रकारे आपली फसवणूक झाल्याचे त्या पीडितेनं सांगितलं आहे.

loading image
go to top