शिबानी दांडेकरचं अंकिता लोखंडेला प्रत्युत्तर, 'तुला स्वतःची सुशांतसोबतची रिलेशनशिप सांभाळता आली नाही आणि...'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

अभिनेत्री शिबानी दांडेकर आहे जी गेल्या अनेक दिवसांपासून रियाला पाठिंबा देताना दिसतेय आता शिबानीने अंकिता लोखंडेवर निशाणा साधत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभी आहे तर अनेक सेलिब्रिटी आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीला पाठिंबा देताना दिसून येत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर आहे जी गेल्या अनेक दिवसांपासून रियाला पाठिंबा देताना दिसतेय. आता शिबानीने अंकिता लोखंडेवर निशाणा साधत एक पोस्ट शेअर केली आहे. 

हे ही वाचा: 'बालिका वधु' फेम सुरेखा सीकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा, ब्रेन स्ट्रोकमुळे आहेत आयसीयुमध्ये दाखल  

अंकिता लोखंडेने नुकतीच एक भली मोठी पोस्ट शेअर करत त्यात रियावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तिने म्हटलं होतं की जर तुम्ही कोणावर खूप प्रेम करत असाल तर त्याला ड्रग्स कसे देऊ शकता? तेही त्याच्या मानसिक स्थितीविषयी माहित असून देखील? आता यावर शिबानी दांडेकरने अंकिताला प्रश्न विचारत एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

शिबानीने अंकितासाठी लिहिलंय, 'या महिलेला सरळ सरळ २ सेकंदाची किर्ती मिळवायची आहे. आणि यासाठी ती सतत रियाला टारगेट करत आहे. कारण ती स्वतः सुशांतसोबतच्या तिच्या नात्यामध्ये असलेल्या अडचणींचा सामना करु शकली नव्हती. तिला असं करण्यासाठी सांगितलं जात आहे.' 

शिबानी काही दिवसांपासून खुलेआम रियाचं समर्थन करताना दिसतेय. तिने लिहिलंय, 'की मी रियाला ती १६ वर्षांची असल्यापासून ओळखते. वायब्रंट, मजबूत, सजीव, तेजस्वी आणि आयुष्याने परिपूर्ण. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती आणि तिच्या कुटुंबियांची वेगळी बाजू पाहायला मिळतेय. दयाळू, सहनशील जे तुम्ही कधी पाहिलं नसेल. ते खूप कष्ट झेलत आहे. आम्ही पाहिलंय की मिडिया कशाप्रकारे गिधाडासारखी त्यांच्यासोबत वागत आहे. जशी कोणीतरी डायन शिकारच करत आहे.'    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I stand with you and by your side always @rhea_chakraborty #justiceforrhea

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

shibani dandekar slams ankita lokhande said she has had never dealt with her own relationship issues with sushant  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shibani dandekar slams ankita lokhande said she has had never dealt with her own relationship issues with sushant