Shikha Malhotra : कोरोनामध्ये दुसऱ्यांची सेवा करताना झाली 'पॅरालाईज्ड', पण जिद्द नाही सोडली!

शिखानं लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. ती नर्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत होती.
Shikha Malhotra  transformation after brain stroke paralysis
Shikha Malhotra transformation after brain stroke paralysisesakal

Shikha Malhotra transformation after brain stroke paralysis : कोरोनामध्ये ज्यांच्यासाठी खूप काम केले, ज्यांची खूप सेवा केली त्या अभिनेत्रीला आता खूप जीवघेण्या वेदनांना सामोरं जावं लागत आहे. तुम्हाला शाहरुख खानचा फॅन नावाचा चित्रपट माहिती आहे का, त्यात एका छोट्या रोलमध्ये ती होती. त्यानंतर तिनं २०२० मध्ये कांचली चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका केली.

शिखा मल्होत्रा आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचे कारण तिचं आजारपण. ती आयुष्याशी मोठी झुंज देत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी शिखानं नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर देशात कोरोनाचा हाहाकार झाला. देश कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करत होता. त्यावेळी शिखानं लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. ती नर्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत होती.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कोरोनाचा तो काळ कुणीही विसरु शकत नाही. या आजारानं काळानं आपल्या जवळची बरीच माणसं नेली. कित्येकांच्या आयुष्याला उद्धवस्त केले. कोट्यवधी लोकांच्या पदरी निराशा आली. काहींच्या नोकऱ्या गेल्या, घरात दोनवेळच्या जेवणाची भ्रांत होती. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्याला कारण कोरोनाचा तो व्हायरस. अशा परिस्थितीत देखील काही माणसं कोरोनाच्या विरोधात लढत होती. अनेकांच्या मदतीला धावून जात होती. शिखा त्यापैकी एक होती.

शिखा ही पहिल्यांदा शाहरुखसोबत फॅन्स नावाच्या चित्रपटामध्ये दिसली होती. त्यात तिनं एक छोटासा रोल केला होता. त्यानंतर ती २०२० मध्ये आलेल्या कांचली नावाच्या चित्रपटामधून चमकली. त्यात ती प्रमुख अभिनेत्री होती. कांचलीमध्ये संजय मिश्रा लीड रोलमध्ये होते. शिखानं बीएमसी रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम केले होते. त्यानंतर तिच्या वाट्याला काय येणार हे तिलाही माहिती नव्हते.

Shikha Malhotra  transformation after brain stroke paralysis
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

कोरोनाग्रस्तांची सेवा करताना शिखा स्वता कोरोनाची शिकार झाली. त्यात तिची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, तिला ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर आता ती पॅरालाईज्ड झाली आहे. सध्या सोशल मीडियावर शिखाचे काही फोटो व्हायरल होत असून त्यावर हजारो नेटकऱ्यांनी तिच्याप्रती सहानूभुती व्यक्त केली आहे. कित्येकांनी तू लवकर या आजारातून बरी होशील असा दिलासा तिला दिला आहे.

शिखाला त्यात आणखी काही आजार झाले आहे. तिचे वजन वाढले आहे. मात्र यासगळ्यातून ती खंबीर मनोवृत्ती आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे. त्यात तिचे पूर्वीचे आणि आताचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. शिखा पूर्वीपेक्षा जास्त सुंदर झाली आहे. तिचे बिकीनी फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Shikha Malhotra  transformation after brain stroke paralysis
Kareena Kapoor : नारायण मूर्तींनी करिनाविषयी सांगितली 'ती' धक्कादायक गोष्ट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com