Video: शिल्पानं एअरपोर्टवरच सुरु केला Workout; फिटनेस मंत्राही केला शेअर Shilpa Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty Airport Workout

Video: शिल्पानं एअरपोर्टवरच सुरु केला Workout; फिटनेस मंत्राही केला शेअर

बॉलीवूड अभिनेत्री(Bollywood Actress) आणि रिअॅलिटी शो ची परिक्षक शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) बॉलीवूडमधील सगळ्यात फीट सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिचं वय जरी आता ४६ असलं तरी विशीतल्या तरुणीला लाजवेल अशी तिची फिगर आहे,आणि त्या विशीतल्या तरुणींपेक्षा ती हॉट दिसते असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरणार नाही. आपल्या चाहत्यांसाठी तिनं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक मोटिवेशनल व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. शिल्पा आपल्या व्यस्त कामातून वर्कआऊट साठी कसा वेळ काढते यावरच सध्या सारे चर्चा करताना दिसत आहेत.

हेही वाचा: मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात;'या' आजारानं आहेत त्रस्त, जाणून घ्या हेल्थ अपडेट

आपल्या सध्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शिल्पानं एअरपोर्ट शटलमध्ये शूट केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. फ्लाइट ते एअरपोर्ट टर्मिनल पर्यंत जाताना शटलमध्ये पुश अप्स,लंग्स आणि पुल-अप्स करताना ती दिसत आहे. इतकंच नाही तर वर्कआऊट केल्यानंतर शिल्पा टिश्यूनं बस चे हॅंडल्स साफ करताना दिसत आहे. ज्याला लटकून तिनं एक्सरसाइज केली होती. अर्थात स्वच्छतेचे धडे देताना ती दिसत आहे.

निळ्या रंगाच्या सेमी-फॉर्मल ड्रेसमध्ये असलेल्या शिल्पानं आपल्या या व्हिडीओसोबत फिट इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान सारखे टॅग्जपण अॅड केले आहेत. व्हिडीओ शेअर करताना शिल्पानं लिहिलंय,''मन्डे मोटिवेशन ऑन द गो...फक्त यासाठी की बस रिकामी होती,त्यामुळे घरी परत जाताना काही पुल-अप्स,पुश-अप्स मारल्या...घरी जाताना एक मिशन पूर्ण झालं. फिट इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान!'' सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ खास व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: 'KGF 2' चं यश पाहून 'Pushpa 2' दिग्दर्शकानं थांबवलं शूट,घेतला मोठा निर्णय?

शिल्पा शेट्टी नेहमीच असे उत्साह वाढवणारे,प्रोत्साहन देणारे व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या 'शेप ऑफ यू' नावाच्या शो मध्ये होस्ट म्हणून शिल्पा दिसत आहे. यामध्ये आतापर्यंत तिनं अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. शिल्पानं आपल्या शो मधील गेस्टसोबत मानसिक-शारिरीक फिटनेसवर देखील बातचीत केली आहे. या शो मध्ये बिग बॉस फेम आणि तिची स्वतःची बहिण शमिता शेट्टी आणि शहनाझ गिल या देखील सामिल झाल्या होत्या.

Web Title: Shilpa Shetty Airport Workout Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top