उर्मिलानं सोडलं कोठारे कुटुंबाचं घर? एकाच इमारतीत वेगळी रहात असल्याची चर्चा Urmila Kothare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila & Adinath

उर्मिलानं सोडलं कोठारे कुटुंबाचं घर? एकाच इमारतीत वेगळी रहात असल्याची चर्चा

आदिनाथ-उर्मिला कोठारे(Adinath & Urmila Kothare) हे कपल मराठी इंडस्ट्रीतलं 'क्यूट कपल' म्हणून ओळखलं जातं. दोघांच्या लग्नाला ११ वर्ष झाली आहेत,एक गोंडस ४ वर्षांची 'जीजा' नावाची मुलगीही त्यांना आहे. तसं पहायला गेलं तर काल-परवापर्यंत एक आयडियल फॅमिली,गोड कुटुंब असंच त्यांच्याबद्दल बोललं जायचं. पण म्हणतात नं, दुधात मिठाचा खडा पडावा तसं या हसत्या-खेळत्या उर्मिला-आदिनाथच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली अन् सगळंच बिनसत गेलं.

हेही वाचा: सुनिल शेट्टी 'गुटखा किंग'! ट्वीटरवर रंगली चर्चा,काय आहे प्रकरण?

काही दिवसांपासून यांच्यात वैचारिक मतभेद सुरू आहेत अशी बातमी कानावर पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार मात्र आता कळत आहे की,गेल्या काही महिन्यांपासून उर्मिला 'कोठारें'च्या घरातनं बाहेर पडली असून मुलीसोबत वेगळी रहात आहे. पण ती आदिनाथ ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीतील दुसऱ्या घरात शिफ्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या लहान मुलीला सध्या उर्मिला आणि आदिनाथचे आई-वडील सांभाळत आहेत असंही ऐकण्यात आलं आहे.

हेही वाचा: सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का? अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार,उर्मिला-आदिनाथ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून धुसफूस सुरु होती. पण कुटुंबामुळे अन् स्वतःभोवती असलेल्या प्रसिद्धिच्या वलयामुळे ते एकत्र असल्याचं भासवत होते. पण खरंतर जेव्हा 'चंद्रमुखी'चं म्हणजेच आदिनाथ काम करीत असलेल्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं तेव्हापासून सगळं बिघडत गेलं आहे. वैचारिक मतभेद तिथनंच सुरु झाले. घरातील वरिष्ठ यावर दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उर्मिला आदिनाथच्या घरातनं बाहेर पडली असली त्याच इमारतीतील 'कोठारे' कुटुंबाच्या दुसऱ्या घरात मुलीसोबत शिफ्ट झाल्याचं कळत आहे.

हेही वाचा: बिकिनीत आयरा तर शर्टलेस आमिर, बर्थे डे पार्टीतील बाप-बेटीचा 'तो' फोटो ट्रोल

आदिनाथ-उर्मिलामध्ये खटके उडतायत,त्यांच्यात दुरावा आल्यात या बातम्यांना फूस मिळाली जेव्हा आदिनाथनं उर्मिलाच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाला ४ मे रोजी शुभेच्छा दिल्या नाहीत त्यावेळी. त्याचबरोबर,आदिनाथच्या बिग बजेट,बिग सिनेमा असलेल्या चंद्रमुखीच्या प्रमोशनमध्ये उर्मिला कुठेच दिसली नाही तेव्हा. अन्यथा,अपेक्षा होती नृत्यात पारंगत असलेली उर्मिला चंद्रमुखीतील चंद्राची हुकअप स्टेप करताना नक्कीच रील व्हायरल करेल अन् आपल्या नवऱ्याच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसेल. पण असं काही घडलं नाही. तसंच उर्मिलानं तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे तेही कोठारे व्हिजन या होम प्रॉडक्शनमधून नाही तर दुसऱ्याच प्रॉडक्शन हाऊसमधून. हे कारणही उर्मिला-आदिनाथ मध्ये बिनसल्याच्या बातमीला हवा देऊन गेलं.

हेही वाचा: उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

आता चाहत्यांना इतकीच अपेक्षा आहे की त्यांच्या या लाडक्या क्यूट कलाकारांनी 'कपल' म्हणून पुन्हा एकत्र नांदावं,मतभेद विसरावेत अन् चाहत्यांना गोड सरप्राइज द्यावं.

Web Title: Urmila Adinath Kothare Dispute Marriage In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top