OTT:शिल्पा शेट्टी करणार काय वेब सीरिजमधे पदार्पण ?

Bollywood:शिल्पा वेब सिरीज मध्ये झळकणार असल्याची हवा सगलीडे जोर धरतेय
Is Shilpa Shetty Entering on OTT Platform
Is Shilpa Shetty Entering on OTT Platform esakal

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची हजेरी लाईव्ह शो पासून ते सोशल मीडियाच्या चर्चेपर्यंत सगळीकडेच कायम असते.या अभिनेत्रीला योगा आणि डाएटसाठी फार मानले जाते.डान्स क्वीन शिल्पा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याची हवा सगलीडे जोर धरतेय.या अभिनेत्रीला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून भरभरून ऑफर्स येत असल्याचे कळते आहे,तरी मात्र शिल्पा वेब सिरीज मध्ये झळकणार याची तीन उघडपणे शाश्वती दिलेली नाही.

९० च्या दशकात शिल्पाने बॉलीवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.काही काळानंतर तिने चित्रपटात काम करणे टाळले.'हंगामा २' या चित्रपटातून तिने ११ वर्ष नंतर परत एक मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.अभिनेत्री शिल्पा ही यूट्यूब,टेलिव्हिजन,चॅट शो,लाईव्ह शो,ट्विटर अशा प्रत्येकच प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह असते.शिल्पाला परत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आणि तिच्या अभिनयासाठी चाहते उत्सुक आहेत.

Is Shilpa Shetty Entering on OTT Platform
Shilpa Shetty gets Angry : शिल्पा शेट्टी बोलतेय आता माझी सटकली | Sakal Media |

चित्रपटानंतर आता वेब सिरीजच्या विश्वात झेप घ्यायला शिल्पा तयार असल्याचे कळते आहे.ओटीटीच्या दिग्दर्शकांकडून तिला अनेक ऑफर्स असल्याचे कळते आहे.शिल्पा शेट्टीला ओटीटी प्रोजेक्टसाठी अनेक चित्रपट निर्मात्यांनी संपर्क साधल्याचे माहिती पुढे येतेय.काही ऑफर्सबद्दल शिल्पा काळजीपूर्वक विचार देखील करते आहे.त्यामुळे लवकरच ती ओटीटीवर झळकण्याची शक्यता आहे.

Is Shilpa Shetty Entering on OTT Platform
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी कुंद्रा पोहोचली 'द कपिल शर्मा शो'मध्ये | Sakal Media |

शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत देवाचे आभार मानले आहेत.ती म्हणाली आम्ही सहन करत असलेल्या काळात आमचा देवावर असलेला विश्वासच एकमेव आधार होता.तसेच मी आभारी आहे देवाची.कारण सगळे जेव्हा त्यांच्या कुटुंबासोबत सॅन साजरे करत होते तेव्हा आंहोई परिस्थितीशी लढत होतो. पण तो मात्र प्रत्येक टप्प्यावर आम्ही काळजी घेत आम्हाला जपत होता.असे म्हणत तिने देवाचे वर्णन 'सुप्रिम पॉवर'अशा शब्दात केले आहे.

शिल्पा शेट्टी सध्या 'इंडियाज गॉट टॅलेंट'ला जज करताना दिसत आहे.शिल्पा चौथ्यांदा रिऍलिटी शो चे परीक्षण करताना दिसतेय.याआधी तिनने 'जरा नचके दिखा', 'नच बलिये' आणि 'सुपर डान्सर' सारख्या शोचं परीक्षण केलं आहे.तसेच शिल्पा 'निकम्मा' या सिनेमात दिसणार असून . सब्बीर खान दिग्दर्शित या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेतिया यांच्याही भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com