VIDEO - 'बदन पे सितारे लपेटे हुए', शिल्पा शेट्टीचा बहिणीसोबत कपल डान्स

वृत्तसंस्था
Friday, 15 January 2021

लॉकडाऊनच्या काळात शिल्पा शेट्टीने तिच्या घरात काम करत असताना, व्यायामाचेही व्हिडिओ शेअऱ केला होते. आता शिल्पा शेट्टीने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्विन अशी ओळख असलेली शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावरून ती फिटनेस आणि योगाचे व्हिडिओ, फोटोच नेहमी शेअर करते. लॉकडाऊनच्या काळात शिल्पा शेट्टीने तिच्या घरात काम करत असताना, व्यायामाचेही व्हिडिओ शेअऱ केला होते. आता शिल्पा शेट्टीने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टी या बहिणी सोशल मिडीयावर अपडेट असतात. तिच्या कॉमेडी आणि योगा, फिटनेसच्या व्हिडिओजना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते. 

सनीलाही लाजवेल असं प्राजक्ताचं 'जबरी' फोटोशुट

शिल्पा आणि शमिताचा कपल डान्स  सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. व्हिडिमध्ये  शिल्पा गुलाबी ड्रेसमध्ये तर शमिता पांढऱ्या ड्रेस मध्ये दिसत आहे. "बदन पे सितारे लपेट हुए "या गाण्यावर शिल्पा आणि शमिता डान्स करत आहेत.  शिल्पा आणि शमिता या व्हिडिओ मध्ये एन्जॉय करत आहेत. 'मी माझ्या आवडत्या स्टारसोबत डान्स करत आहे. माझ्या डान्स पार्टनरसोबतची एक संध्याकाळ' असे कॅपशन शिल्पाने या व्हिडिओला दिले आहे.

'बिदिताचं घायाळ करणारं फोटोशुट ; फॅन्स चक्रावले'

लाइफ इन अ मेट्रो, मै खिलाडी तु अनाडी, रिश्ते या चित्रपटांमध्ये शिल्पाने काम केले आहे. शिल्पा शेट्टी ही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि निर्माती आहे. नच बलिये, सुपर डान्सर या शोचे परीक्षण तिने केले आहे.

शिल्पा बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र आता पुन्हा ती कमबॅक करत आहे. लवकरच शिल्पा दोन चित्रपटांमधून दिसणार आहे. निकम्मा आणि हंगामा 2 यापैकी हंगामा 2 चे शूटिंग सुरूही झालं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa shetty kundra dancing with shamita shetty on badan pe sitare