शिल्पा, मायकल आणि प्रोजेक्‍टस्...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

जगभरात शिल्पाचे किती फॅन्स आहेत, हे वेगळे सांगायला नको. शिल्पा शेट्टी गेली अनेक वर्षे रुपेरी पडद्यापासून बाजूला असली तरी वेगवेगळ्या रिऍलिटी शोसाठी परीक्षक म्हणून ती दिसत असते. तसेच ती वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी काम करते.

प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि टीव्ही होस्ट मायकल मोल्सेने शिल्पाबरोबर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. शिल्पा फिटनेसच्या बाबतीत खूप सजग आहे आणि ती त्याबाबत दुसऱ्यांनाही तेवढेच मार्गदर्शन करत असते. मायकल मोस्ले म्हणाले, "शिल्पामध्ये एक अभूतपूर्व उत्साह आहे आणि तिच्याबरोबर काही प्रोजेक्‍ट्‌ससाठी काम करायला खूप मजा येईल. शिल्पाला भेटून मला खूप बरे वाटले. आम्ही फिटनेसविषयी गप्पा मारल्या, त्यावर चर्चा केली. हा विषय असा आहे, की त्यावर आमचे खूप चांगले जुळते. तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान असेल. कारण मी विज्ञान आणि शैक्षणिक पार्श्‍वभूमीचा आहे आणि तिला डाएट आणि फिटनेसबाबतीत खूप अनुभव आहे.'

शिल्पाही नक्कीच मायकल यांच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असेल. शिल्पा सध्या तिच्या बीझी शेड्युलमधून मालदिवला सुट्टी एन्जॉय करतेय. ती आल्यानंतर तिचे आणखीन काही प्रोजेक्‍ट्‌स सुरू होतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa shetty michale and their projects