फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पाची प्रतिक्रिया; म्हणाली...|Shilpa Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj shilpa

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पाची प्रतिक्रिया; म्हणाली...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिल्पा आणि राज हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक बरई याने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खान यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज आणि शिल्पा यांनी एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं त्याने म्हटलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिल्पाने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे शिल्पा शेट्टीची पोस्ट-

'सकाळी मला राज आणि माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याचं समजलं. हे ऐकून मला धक्का बसला. SFL फिटनेस ही एक कंपनी असून याचा सर्वेसर्वा हा काशिफ खान आहे. ही संपूर्ण कंपनी तो एकटा चालवत होता. या ब्रँडच्या नावाने देशभरात जिम उघडण्याचे संपूर्ण अधिकार हे फक्त त्याच्याकडेच होते. तसेच सर्व करारांवर तोच स्वाक्षरी करायचा. बँकिंग आणि इतर नियमित कामाची जबाबदारी देखील त्याच्यावर होती. त्यामुळे आम्हाला त्याच्या कोणत्याही व्यवहाराची माहिती नाही. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. या सर्व फ्रँचायझी थेट काशिफ खानकडून घेता येत होत्या. ही कंपनी २०१४ मध्ये बंद झाली असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही काशिफ खान यांनी घेतली होती. मी गेल्या २८ वर्षांपासून फार मेहनतीने काम करत आहे. पण फक्त लोकांचं लक्ष वेधण्यासाठी इतक्या सहजतेने माझं नाव घेतलं जातं आणि माझी प्रतिमा मलिन केली जाते, हे पाहून मला फार दु:ख होत आहे. मी कायद्याचे पालन करणारी जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी माझ्या अधिकारांचे संरक्षण करणार,” असं तिने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

याप्रकरणात पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४, १२०(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता लवकरच मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची चौकशी होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top