शिल्पा शेट्टी अस्खलित मराठीत म्हणाली.... Shilpa Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी अस्खलित मराठीत म्हणाली....

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. अगदी तिच्या घरापासून ते शुटिंगच्या सेटपर्यंतच्या सगळ्या अपडेट्स ती फोटोच्या किंवा मग व्हिडीओ्च्या स्वरुपात सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. काहीच दिवसांपूर्वी तिनं तिच्या छोट्या मुलीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला अनं चाहत्यांनी भरभरुन तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला. आपल्या फीटनेसच्या बाबतीत तर ती अतिजागरुक आहे. तिचं स्वतःचं फीटनेस अॅप ही आहे. ज्या माध्यमातनं ती लोकांना फीट राहण्याचे धडे देत असते.

पण इतरही वेळेला ती तिच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. राज कुंद्रा प्रकरण चांगलच महागात पडल्यावर काही दिवस तिनं सोशल मीडियापासून लांब राहणं पसंद केलं होतं . बरं त्यामुळं तिच्यावरही ताशेरे ओढले गेले अनं नकारात्मक चर्चाही झाली हे तिच्यासाठी तापदायकच होतं. तर असो अशी चर्चेत असणारी शिल्पा आज मात्र एका वेगळ्याच व्हिडीओ मुळे चर्चेत आलीय.

हेही वाचा: महेश मांजरेकरांवर शिवसैनिक संतापले;थेट मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

या व्हिडीओत शिल्पाच्या हातात आहे तीळाच्या लाडवांनी भरलेलं ताट. अनं शिल्पा चक्क मराठीत म्हणतेय,'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला'. आता या दाक्षिणात्य मुलीच्या तोंडून चक्क मराठीत शुभेच्छा ऐकताना फॅन्स भारीच खुश झाले नं तिच्यावर. शिल्पा शेट्टीच्या व्हिडीओजना नेहमीच फॅन्सकडून पसंद केलं जातं. शिल्पा सध्या 'इंडियाज गॉट टॅलेन्ट'च्या नवव्या सीझनची परिक्षक म्हणून काम पाहत आहे. ती गेल्या काही वर्षात रिअ्ॅलिटी शोज च्या परिक्षकेच्या माध्यमातनं आपल्या भेटीस येत आहे. सिनेमात ती फार कमी काम करीत असली तरी परिक्षक म्हणून काम करतानही तिनं स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top