शिल्पा शेट्टीचं नवीन हॉटेल पाहिलंय ?

Shilpa Shetty start new hotel in bandra invited geneliya and ritesh deshmukh
Shilpa Shetty start new hotel in bandra invited geneliya and ritesh deshmukh

मुंबई - प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं बास्टियन चेन बरोबर नवे हॉटेल सुरु केले आहे. तिनं त्याचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत. वरळीत असणा-या या हॉटेलच्य़ा फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या फोटोवर कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, आता ते रेडी झाले आहे.

सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणा-या शिल्पानं आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या सादरीकरणामुळे एक खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून लांब असली तरी योगासनं, रियॅलिटी शो च्या माध्यमातून तिनं आपला ठसा उमटवला आहे. तिच्या नव्या हॉटेलच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केली आहे.

मुंबईतील बांद्रा भाग वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेलिंगसाठी प्रसिध्द आहे. त्यात नवनवीन हॉटेलची भर पडत असते. शिल्पानं आपल्या नवीन हॉटेल्ससाठी कमिंग सूनचा हॅशटॅग ठेवला आहे.

शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी सुरु केलेल्या हॉटेलमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांना मेजवानीकरिता बोलावले होते.

राज आणि शिल्पाचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. त्यात ती ब्लॅक कलरचा टॉप आणि लेदर पँन्टमध्ये दिसत आहे. त्या फोटोंना चाहत्यांनी लाईक केलं आहे. याविषयी जेनेलियानं तिच्या सोशल अकाऊंटवर लिहिलं आहे. ती म्हणाली, शिल्पा आणि राज तुम्हा दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. बास्टियनमध्ये घालवलेली ही सायंकाळ खूपच छान होती. जेवणही एकदम खास होतं. तुम्हा दोघांनाही त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

बास्टियनमध्ये शिल्पानं 50 टक्क्याहून अधिक गुंतवणूक केली आहे. 2019 पासून तिनं ही सुरुवात केली आहे. याशिवाय ती काही फिटनेस अॅपही रन करते आहे. तसेच हेअर केअरसाठी एक नवा ब्रॅण्डही तिनं तयार केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com