esakal | राज कुंद्राच्या अनुपस्थितीत शिल्पाने लालबागमधून घरी आणला बाप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

shilpa

राज कुंद्राच्या अनुपस्थितीत शिल्पाने लालबागमधून घरी आणला बाप्पा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कलेचा देवता असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरी दरवर्षी होतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या Shilpa Shetty घरी दरवर्षी जल्लोषात बाप्पाचं आगमन होतं. पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानसह ती मनोभावे गणपतीची Lord Ganesha पूजा करते. मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात पती राज कुंद्रा Raj Kundra तिच्यासोबत नसणार आहे. पतीच्या अनुपस्थितीत शिल्पा मुंबईतील लालबागमध्ये गणपतीची मूर्ती आणण्यासाठी पोहोचली होती. गेले काही दिवस शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांसाठी जरी संघर्षाचे असले तरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शिल्पानं घेतला आहे. दरवर्षी राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टी तिच्यासोबत गणपतीची मूर्ती आणण्यासाठी लालबागला पोहोचतात. मात्र यंदा एकट्या शिल्पानेच ही मूर्ती घरी आणली.

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामिन अर्जावर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तर शिल्पाची बहीण शमिता सध्या बिग बॉसच्या घरात आहे. शिल्पाने घरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ती लालबागमधल्या गणेश चित्रशाळेत बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने पापाराझींसाठी फोटोसुद्धा काढले. बाप्पाला घरी आणताना शिल्पाने पापाराझींच्या कॅमराकडे पाहून हात जोडून नमस्कार केला. यावेळी बघ्यांचीही बरीच गर्दी जमली होती.

हेही वाचा: भारती सिंगने १५ किलो वजन केलं कमी; सांगितला खास डाएट प्लान

पतीच्या अटकेनंतर शिल्पाने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तिने कामाला सुरुवात केली आहे. 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून परतली आहे. त्याचसोबत सोशल मीडियावरही ती फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आहे.

loading image
go to top