शिल्पा शेट्टीने दिल्या संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

वृत्तसंस्था
Wednesday, 15 January 2020

आज मकर संक्रांती! संक्रांती आणि काळे कपडे घट्टं नातं. बॉलिवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा संक्रंती विशेष एक व्हिडीओ व्हाय़र होत आहे. जाणून घ्या नक्की कसला आहे हा व्हिडीओ. 

मुंबई : आज मकर संक्रांती! संक्रांती आणि काळे कपडे घट्टं नातं. आज काळे कपडे घालून फिरणाऱ्यांची रेलचेल असते. संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीच काळ्या कपड्यांच्या खरेदीला सुरवात होते. याला अभिनेत्रीही अपवाद नाहीत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सुंदर काळ्या रंगाच्या साड्या नेसून फोटो शूट केलंय. इंटरनेटवर सध्या ते फोटो चांगलेचं व्हायर होत आहेत. पण, आणखी एका अभिनेत्रीने नेटकऱ्यांचे लक्ष खास वेधून घेतले आहे. बॉलिवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा संक्रंती विशेष एक व्हिडीओ व्हाय़र होत आहे. जाणून घ्या नक्की कसला आहे हा व्हिडीओ. 

एक नंबर! काळ्या साडीत खुललंय या तारकांचं सौंदर्य!!

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. योग, फिटनेस आणि व्य़ायाम याविषयी ती चाहत्यांना सोशल मीडियावरुन मार्गदर्शन करत असते. चाहत्यांना फिटनेसची माहिती देणारे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. एवढचं काय हेल्दी फुड म्हणजे पोष्टिक आहाराविषयीही ती अनेक पोस्ट करते. सध्या इंटरनेटवर तिचा एक टीक-टॉक व्हिडीओ व्हायरल होतोय. 

मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या शुभेच्छा देणारा एक टीक टॉक व्हिडीओ तिने शेअर केलाय. या व्हिडीमध्ये ती तिळगुळ हातामध्ये घेऊन चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते आहे. एवढचं काय या शुभेच्छा तिने मराठीमध्ये देऊन चाहत्यांना अधिक खूश केले आहे. इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

अग्गंबाई सासूबाईमधला सोहम म्हणतोय 'शेजारचे माझ्याकडे दुलर्क्ष करु लागलेत'

शिल्पा शेट्टी एक उत्तम अभिनेत्री आहे. टीव्हीवरील अनेक शोमध्ये ती परिक्षक म्हणूनही झळकते. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते. फिटनेस आयकन असलेल्य़ा शिल्पाचा फिटनेसचा अॅपही आहे. फिटनेसविषयी ती पुस्तकही लिहिते. लवकरच ती बऱ्याच दिवसांनंतर बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. परेश रावलसोबत 'हंगामा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa shetty wishing fans makar sankratni in marathi on tiktok