OMG ! कारच्या किंमतीएवढी शिल्पाची 'ही' हॅंडबॅग

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

सेलिब्रिटींच्या बॅगविषयी बोलायचं तर एकापेक्षा भारी आणि महागड्या बॅगची जणू शर्यतच लागली आहे. शिल्पा शेट्टीही सध्या तिच्या अशाच एका बॅगमुळे चर्चेत आली आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये फॅशन, स्टाइल आणि ग्लॅमरला किती महत्त्व आहे तर तुम्हाला माहितच असेल. त्यामुळे स्वत: अपडेटेड आणि फॅशनमध्ये पुढे ठेवण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार काही करु शकतात. या कलाकारांचे एअरपोर्ट लुक, पार्टी लुक, वेकेशन लुक असं सर्वच काही कॅप्चर केलं जातं. त्यामुळे हे स्टार आपल्या लुकसाठी लाखो काय कोटी रुपये खर्च करण्यासाठीही तयार असतात. बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या एका बॅगची किंमत ऐकुन तुम्हीही व्हाल थक्क !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Eat. Pray. Slay. Repeat.#fashion #style #carpediem #blessed #aboutyesterday #friyay #fridayvibes #green #gratitude

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

अभिनेत्री स्टारडम टिकवण्यासाठी अनेकदा लाखो रुपये खर्च करताना दिसतात, शॉपिंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक ड्रेस, अॅक्सेसरीज, शुज, पर्स हे ब्रॅंडेड आणि हटके असतं. खासकरुन सेलिब्रिटींच्या बॅगविषयी बोलायचं तर एकापेक्षा भारी आणि महागड्या बॅगची जणू शर्यतच लागली आहे. शिल्पा शेट्टीही सध्या तिच्या अशाच एका बॅगमुळे चर्चेत आली आहे. 

शिल्पा नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तिच्या या लुकची चर्चा खासकरुन सुरु आहे ती तिच्या बॅगमुळे ! त्यावेळी शिल्पाने ब्राऊन रंगाची एक बॅग घेतली होती. शिल्पाच्या हातातील ही बॅग आहे 'हर्मिन बर्किन' या ब्रॅंडची आणि त्याची किंमत आहे चक्क 10 लाख रुपये. तिच्या या बॅगच्या किंमतीमध्ये एखादी कार विकत घेता येऊ शकते. शिल्पाला या बॅगसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. 

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सतत अॅक्टीव असते. योग, फिटनेस आणि व्य़ायाम याविषयी ती चाहत्यांना सोशल मीडियावरुन मार्गदर्शन करत असते. चाहत्यांना फिटनेसची माहिती देणारे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. एवढचं काय हेल्दी फुड म्हणजे पोष्टिक आहाराविषयीही ती अनेक पोस्ट करते. सध्या इंटरनेटवर तिचा एक टीक-टॉक व्हिडीओ व्हायरल होतोय.

शिल्पा शेट्टी एक उत्तम अभिनेत्री आहे. टीव्हीवरील अनेक शोमध्ये ती परिक्षक म्हणूनही झळकते. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते. फिटनेस आयकन असलेल्य़ा शिल्पाचा फिटनेसचा अॅपही आहे. फिटनेसविषयी ती पुस्तकही लिहिते. लवकरच ती बऱ्याच दिवसांनंतर बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. परेश रावलसोबत 'हंगामा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ती झळकणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Shettys bag worth of rupees ten lakh