गँग्स ऑफ फिल्मिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर शिल्पा शिंदेने सुनिल ग्रोव्हरवर केले आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

बिग बॉस 11 ची विजेती आणि भाभीजी घर पर है या टीव्ही सिरियलमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गँग्स ऑफ फिल्मिस्तान या शोमधून बाहेर पडली आहे. 

मुंबई - बिग बॉस 11 ची विजेती आणि भाभीजी घर पर है या टीव्ही सिरियलमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गँग्स ऑफ फिल्मिस्तान या शोमधून बाहेर पडली आहे. सुनिल ग्रोव्हरसोबत वादामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. एका मुलाखतीत तिने शो का सोडला याबाबत खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, सुनिल ग्रोव्हरला असं वाटतं की तो एकटाच कॉमेडी कींग आहे. त्याला स्वत;ला नेहमी असुरक्षित वाटत असतं. त्याने आजवर एकट्याने एकतरी हीट शो दिला आहे का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. 

नुकताच शिल्पा शिंदेनं गँग्स ऑफ फिल्मीस्तान या कॉमेडी शोला रामराम ठोकला. सुनिल ग्रोव्हर भाग असलेल्या शोमध्ये मला काम करायचे नसल्याच्या अटीवरच मी काम करेन, असं तिने म्हटलं होतं. भाभीजी घर पर है ही मालिका आणि बिग बॉस ११ मुळे शिल्पा शिंदे चर्चेत होती. आता तिने सुनिल ग्रोव्हरच्या गँग्स ऑफ फिल्मिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

हे वाचा - बिग बींची खास नंबरची अलिशान कार; फोटो व्हायरल झाल्यावर ट्रोलर्सनी दिला सल्ला

'पिंकव्हीला'ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, सुनिल हा असुरक्षिततेची भावना असलेला माणूस असून तो स्वत;ला कॉमेडी कींग समजतो. मी ज्युनिअर आर्टीस्ट असल्यासारखे त्याने मला वागवले असे आरोप केले आहेत. तुम्ही शोमध्ये पहा की त्याने मला किती रोल दिला आहे. सुनिलला त्याच्या बाजूला आधार म्हणून उभी असलेली सुंदर मुलगी लागते जिचा वापर ते विनोदांसाठी करू शकतात. पुढे ती म्हणाली की, सुनिल ग्रोव्हर यांनी एकही सोलो हिट शो दिला नाहीये.

करोना काळात घ्यायच्या खबरदारीच्या उपायांबाबतही शिल्पाने शोच्या निर्मात्यांवरही आरोप केले आहेत. आम्ही सलग बारा-बारा तास काम करत आहोत. परंतु, मला असे वचन दिले गेले होते की, आठवड्यातून केवळ दोनच दिवस शूटिंग असेल. त्याबरोबरच सुनिल  ग्रोव्हरसोबत काम न करण्याच्या इच्छेवरही सहमती दाखवली गेली होती. परंतु, निर्मात्या प्रीती सिमोज यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa shinde revealed why decide quit gangs of filmistan