तू तेव्हा तशी: 'माझ्या खऱ्या आयुष्यातही 'पट्या' होता पण...'- शिल्पा तुळसकर Shilpa Tiulaskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Tulaskar
सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वैयक्तिक आयुष्यासोबत आपल्या करिअर संदर्भातही भरभरुन संवाद साधला आहे. #esakal #shilpatulaskar #marathiactress #sakalpodcast

तू तेव्हा तशी: 'माझ्या खऱ्या आयुष्यातही 'पट्या' होता पण...'- शिल्पा तुळसकर

अभिनेत्री शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) सध्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीस आली आहे. मालिकेतील तिच्या अनामिका या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पानं मराठी-हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग दोन्हीकडे आहे. शिल्पानं खूप वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. शिल्पानं सकाळ पॉडकास्टसाठी दिलेली विशेष मुलाखतीची लिंक खाली बातमीत जोडली आहे.

आपण सिनेमे का कमी केले,किंवा आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका खूप लहान वयात का केल्या,आपल्या खऱ्या आयुष्यातील 'पट्या' कोण? अशा अनेक मुद्द्यांवर शिल्पा तुळसकरनं सकाळ पॉडकास्टच्या माध्यमातून भरभरुन संवाद साधला आहे. पण यासाठी वर बातमीत शिल्पा तुळसकरच्या पॉडकास्ट मुलाखतीची लिकं जोडलेली आहे. तेव्हा मुलाखत ऐकायला विसरु नका. दर शनिवारी आम्ही आपल्या आवडत्या कलाकाराची मुलाखत भेटीस घेऊन येतो, आमच्या Sakal Unplugged या कार्यक्रमातून.

हेही वाचा: रणवीरला मोठा झटका; 'जयेशभाई जोरदार'चे 30 टक्के शो कॅन्सल,जाणून घ्या कारण

या मुलाखतीत शिल्पानं 'हद कर दी','शांती' या तिच्या अनेक हिंदी मालिकांविषयीच्या सेटवरील किस्से-आठवणी देखील शेअर केल्या आहेत. तसंच तिनं चाळीशीनंतर स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष द्यायलाच हवं,सुंदर दिसण्यापेक्षा स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा याविषयी देखील शिल्पानं खूप छान उत्साही विचार मांडले आहेत. आणि ते केवळ स्त्रियांनी नाही तर पुरुषवर्गानं देखील ऐकण्यासारखे आहेत. मग कोणाचीच ओरड होणार नाही की माझी बायको आता पूर्वीसारखी राहत नाही,दिसत नाही अशी. तेव्हा शिल्पानं जे या मुलाखतीच्या शेवटी मांडलं आहे हे नक्कीच सर्वांनी ऐकण्यासारखं आहे. आणि हो,मालिकेतील शिल्पाच्या आयुष्यातील मित्र 'पट्या' आपल्या सगळ्यांना माहित आहे पण तिच्या खऱ्य़ा आयुष्यातील पट्याविषयी देखील खुलासा तिनं केला आहे. तेव्हा नक्की ही मुलाखत ऐका.

Web Title: Shilpa Tulaskar Tu Tenvha Tashi Sakal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top