रणवीरला मोठा झटका; 'जयेशभाई जोरदार'चे 30 टक्के शो कॅन्सल,जाणून घ्या कारण

13 मे ला रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं कलेक्शनही समाधानकारक नाही.
Ranveer Sing In ' JayeshBhai Jordaar'
Ranveer Sing In ' JayeshBhai Jordaar' Google

13 मे ला रणवीर सिंगचा(Ranveer Singh) 'जयेशभाई जोरदार'(Jayeshbhai Jordaar) सिनेमा प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या सिनेमाला बॉक्सऑफिसवर फक्त ३.२५ करोड कमाईवरच समाधान मानावं लागलं आहे. सिनेमाचं पोस्टर,ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद मिळाला नव्हता. आणि यामुळेच सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकताच पहायला मिळाली नाही. सिनेमाचे समिक्षक आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सिनेमाविषयी चांगले रिव्ह्यू दिलेले आढळून आले नाहीत. तर 'जयेशभाई जोरदार' सिनेमाला प्रदर्शनाआधीच अभिनेता आणि समिक्षक कमाल आर खानने थेट 'आपत्ती' म्हटलं होतं. आता त्याचं बोलणं खरं होताना दिसत आहे. आता पुन्हा कमाल आर खानने या सिनेमाविषयी नवीन ट्वीट केलं आहे.

Ranveer Sing In ' JayeshBhai Jordaar'
रविवारी सुट्टी मागितली म्हणून मालिकेतूनच काढलं; शुभावी चौकसीचा मोठा खुलासा

केआरके नं आज 'जयेशभाई जोरदार' संदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यानं म्हटलंय,''आज जयेशभाई जोरदारचे ३० टक्के शो कॅन्सल झाले आहेत,कारण प्रेक्षकच सिनेमा पहायला आला नाही. म्हणजे सिनेमा दुसऱ्याच दिवशी फ्लॉप ठरला''. केआरकेच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पटापट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे जिथे लोकं केआरकेच्या ट्वीटचं समर्थन करताना दित आहेत तिथे दुसरीकडे रणवीरचे चाहते मात्र आपल्या लाडक्या जयेशभाईच्या बाजूनं बोलताना दिसत आहेत.

सुरुवातीला तर केआरकेनं हद्दच केली. त्यानं थेट 'जयेशभाई जोरदार' सिनेमासाठी पोल घेतलं ज्याला नंतर रीट्वीट करत म्हटलं की,'' सर्वे केल्यानंतर आढळून आलं आहे की ६१ टक्के लोक 'जयेशभाई जोरदार' पाहण्यास इच्छुक नाहीत. रणवीरला डबल ढोलकी संबोधत केआरकेनं लोकं त्याला कसं पसंत करत नाहीत याचा देखील उल्लेख केला. सिनेमा चांगला असला तरी रणवीर आवडत नसल्यामुळे ते हा सिनेमा पाहणार नाहीत'' असंही केआरके म्हणाला होता.

Ranveer Sing In ' JayeshBhai Jordaar'
वयाच्या ७४ व्या वर्षी मुमताजचा 'त्या' विवाहबाह्य संबंधाविषयी मोठा खुलासा

'जयेशभाई जोरदार' या सिनेमाचं कथानक खरंतर एका चांगल्या सामाजिक धोरणाला पाठिंबा देतं. या सिनेमात 'मुलगी वाचवा,मुलगी शिकवा' हे सरकारी धोरण कथेच्या माध्यमातून मांडलं आहे. पण आता सिनेमा पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे की सांगितलं तसं काहीच नाही. उलट गंभीर विषयाचं हसं करुन ठेवलं आहे. सिनेमाच्या कथानकावरुन दिग्दर्शक दिव्यांग ठक्करवर देखील ताशेरे ओढले जात आहेत,कारण कथा त्यानंच लिहिली आहे. सगळे मुद्दे एकत्र दाखवण्याच्या नादात कथा फसल्याचं लोक म्हणत आहेत. 'जयेशभाई जोरदार' सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच लीक झाला म्हणून देखील त्याच्या बॉक्सऑफिस कलेक्शनला फटका बसल्याचं म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com