'कशामुळे कंगनाला मिळाला पद्मश्री?; शिवसेनेचे खासदार संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कशामुळे कंगनाला मिळाला पद्मश्री?; शिवसेनेचे खासदार संतापले
'कशामुळे कंगनाला मिळाला पद्मश्री?; शिवसेनेचे खासदार संतापले

'कशामुळे कंगनाला मिळाला पद्मश्री?; शिवसेनेचे खासदार संतापले

मुंबई - बॉलीवूडची क्वीन अशी जिची ओळख आहे त्या अभिनेत्री कंगनाची वादग्रस्त वक्तव्ये अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना चर्चेत आली आहे. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते आता 2014 मध्ये. जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. अशाप्रकारचे वक्तव्य कंगनानं केलं होतं. त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. तिच्यावर बॉलीवूडसकट राजकीय नेत्यांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मराठीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या त्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांनाही ट्रोल व्हावे लागले होते.

शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी कंगनावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी कंगनाच्या त्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. त्यांनी कंगनावर तोफ डागताना म्हटलं आहे की, कंगनानं म्हटल्यानुसार जर, गांधीजी यांना सत्तेची हाव होत असं म्हटलं तर ते त्यावेळी पंतप्रधान काय राष्ट्रपती देखील झाले असते. त्यांना ती गोष्ट काही अशक्य नव्हती. मात्र तसे झाले नाही. मला तर कंगनाला पद्मश्री का म्हणून दिला असा प्रश्न पडला आहे. असं तिनं काय काम केलं की तिला देशातील सर्वोच्च अशा पुरस्कारानं तिला गौरविण्यात आले आहे. केंद्रात सत्तास्थानी बसलेल्या लोकांची खुशमस्करी करुन त्यांची मर्जी राखणे यासाठी तिला पद्मश्री मिळाला का...असा सवालही तुमाने यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: ‘कंगना राणावतवर मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करा’

हेही वाचा: विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून कंगना भलतीच आक्रमक झाली आहे. तिनं केलेल्या विधानांची चर्चा ही देशभर होत आहे. तिनं सोशल मीडियावर असे लिहिले होते की, जर तुमच्या गालावर कोणी एक चपराक मारत असेल तर अशावेळी तुम्ही दुसरा गाल पुढे करणं ही काय आझादी नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणे पसंद केले त्या लोकांमध्ये हिंमत होती. आणि त्यांच्या रक्तामध्ये एकप्रकारचा जोश होता. असं विधान कंगनानं केलं होतं.

loading image
go to top