राखी सावंत करणार 'तो' अवयव दान

वृत्तसंस्था
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

आपल्या मृत्यूनंतर कोणी ना कोणी कुठला ना कुठला तरी अवयव दान करत असतो. परंतु, आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आलेली राखी सावंत सध्या वेगळाच अवयव दान करणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिने अवयव दानाविषयी तिचं मत मांडताना तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई- आपल्या मृत्यूनंतर कोणी ना कोणी कुठला ना कुठला तरी अवयव दान करत असतो. परंतु, आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आलेली राखी सावंत सध्या वेगळाच अवयव दान करणार असल्याचे तिने सांगितले आहे. तिने अवयव दानाविषयी तिचं मत मांडताना तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने स्तनदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिला स्तनदान का करायचे या मागील कारणही सांगितले. विशेष म्हणजे तिचे हे वक्तव्य प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलं आहे, अशा प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या इतरांसाठी आपल्या मदतीचा हात पुढे करत असतात. गरजू रुग्णांना आपले अवयवदान करुन त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करुन देण्यास मदत करत असतात. त्यामुळेच मी देखील या गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. मी जास्त काही मदत करु शकत नाही. पण जे माझ्याकडे आहे ते मी नक्कीच देऊ शकते, असं राखीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.पुढे ती म्हणाली आहे की, आतापर्यंत अनेकांनी डोळे, फुफ्फुस, वैगरे यासारख्या महत्वाच्या अवयवांचं दान केलं आहे. मात्र मी माझं स्तनदान करु इच्छिते.
 

 
 
 
 

 

 

 
 
 
 
 
 
 
 

#aishwaryaraibachchan #aishwaryarai

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

दरम्यान, राखी अनेक वेळा तिचं मत स्पष्टपणे व्यक्त करत असते. त्यामुळे तिच्या या वक्तव्यांमुळे तिला काही वेळा ट्रोलही व्हावं लागत असतं. मात्र राखीने कायमच ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं आहे. यापूर्वीही अनेकवेळा तिने अशाप्रकारच्या वादग्रस्त पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking Rakhi Sawant Wants To Donate Her Boobs To The Society In This Viral Video