श्रद्धा बनणार "ठग'? 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

परफेक्‍टनिस्ट आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन "ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चित्रपटातून प्रथमच एकत्र येत आहेत. हटके नाव असल्यामुळे चित्रपटाची चर्चा आतापासूनच सुरू झालीय. नावावरूनच तो ऍक्‍शनपॅक्‍ड असेल याची कल्पना येते. आमीर आणि अमिताभ यांच्या रूपात दोन ताकदीचे कलाकार एकत्र येत असल्याने सिनेरसिकांत आतापासूनच त्याची उत्सुकता आहे. आमीरच्या इतर चित्रपटांसारखाच तो बॉक्‍स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार हे नक्की. चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव मात्र आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते; पण सूत्राच्या माहितीनुसार "रॉक ऑन' अभिनेत्री श्रद्धा कपूर "ठग्ज...'च्या गॅंगमध्ये सामील होणार आहे.

परफेक्‍टनिस्ट आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन "ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चित्रपटातून प्रथमच एकत्र येत आहेत. हटके नाव असल्यामुळे चित्रपटाची चर्चा आतापासूनच सुरू झालीय. नावावरूनच तो ऍक्‍शनपॅक्‍ड असेल याची कल्पना येते. आमीर आणि अमिताभ यांच्या रूपात दोन ताकदीचे कलाकार एकत्र येत असल्याने सिनेरसिकांत आतापासूनच त्याची उत्सुकता आहे. आमीरच्या इतर चित्रपटांसारखाच तो बॉक्‍स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार हे नक्की. चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव मात्र आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते; पण सूत्राच्या माहितीनुसार "रॉक ऑन' अभिनेत्री श्रद्धा कपूर "ठग्ज...'च्या गॅंगमध्ये सामील होणार आहे. नुकतीच तिने चित्रपटासाठी स्क्रिन टेस्ट दिली. धमाल ऍक्‍शन करायलाही ती तयार आहे. या आधीही श्रद्धाने "बागी' चित्रपटात ऍक्‍शन हिरोईनची भूमिका केली होती. त्यामुळे तिच्यासाठी ऍक्‍शन काही नवीन नाही. "हसिना... द क्वीन ऑफ मुंबई'मध्येही ती दाऊदच्या बहिणीची भूमिका करते आहे. त्यामुळे कदाचित "ठग्ज...'साठी तिची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. आमीरला आपण दाढी-मिशीवाल्या लूकमध्ये कधीही पाहिलेले नाही. "ठग्ज...'साठी त्याने हटके लूक केला आहे. त्यामुळे चित्रपटाची हवा चांगलीच गरम आहे. 

Web Title: shraddha kapoor ACt in Thag