EXCLUSIVE : अखेर श्रद्धा कपूरनं केला माधुरी दिक्षितचा पत्ता कट

'पुण्यश्लोक अहिल्या' सिनेमात साकारणार अहिल्याबाई होळकरांची भुमिका
Shraddha Kapoor, Madhuri Dixit
Shraddha Kapoor, Madhuri DixitGoogle

ऐतिहासिक सिनेमा करणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. या सिनेमांसाठी भूमिकेचा लागणारा गाढा अभ्यास हा केवळ लिहिताना लेखकालाच करायचा नसतो तर त्याच्यासोबत दिग्दर्शक आणि ऐतिहासिक भूमिका साकारणा-या कलाकाराचीही तितकीच जबाबदारी असते. त्यात ऐतिहासिक भूमिकांचा जो तामझाम असतो तो अगदी त्यापद्धतीनंच चित्रित होऊन मोठ्या पडद्यावर दिसायला हवा. 'मुघल-ए-आझम' सिनेमापासून आताच्या 'जोधा अकबर','पानिपत','मोहेंजोदारो','देवदास','बाजीराव मस्तानी', 'द लीजेंड ऑफ भगतसिंह','लगान' अशा कितीतरी सिनेमांची नावं घेता येतील ज्यांनी पडद्यावर त्या ऐतिहासिकतेचा ग्रॅंझर तसूभर कमी होऊ दिला नाही. यापैकी काही सिनेमांनी तर बॉलीवूडच्या इतिहासात बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन करून एक हिस्ट्री केली आहे.

Shraddha Kapoor, Madhuri Dixit
जॅकलिन फर्नांडिसला ईडीने बजावले समन्स

आतापर्यंत मधुबाला यांनी साकारलेली अनारकली,ऐश्वर्यांन साकारलेली जोधा,दिपिकानं साकारलेली मस्तानी,प्रियंकानं साकारलेली काशीबाई अशा भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. आता या ऐतिहासिक भूमिका साकारणा-या अभिनेत्रींच्या यादीत श्रद्धा कपूर विराजमान होण्यासाठी सज्ज झालीय. दिलिप भोसले दिग्दर्शित 'पुण्यश्लोक अहिल्या' या ऐतिहासिक सिनेमात श्रद्धा 'अहिल्याबाई होळकरांची' भूमिका साकारणार आहे. याआधी ही भूमिका माधुरी दिक्षित करणार होती असं दिलिप भोसले म्हणाले. पण भूमिकेच्या काही ट्रॅक्समध्ये माधुरी दिक्षितचे वय आडवे येत होते म्हणून श्रद्धाला घेण्याचे ठरले असंही भोसले म्हणाले. अहिल्याबाई यांची कामगिरी ही संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा सिनेमा मराठीत नं करता हिंदीत करायचे ठरविले असंही भोसले यांनी नमूद केलं. तसंच या सिनेमात अहिल्याबाईंच्या जन्मापासून पुढे अनेक टप्प्यावर त्यांनी दिलेले लढे आणि केलेल्या कल्याणकारी कामांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे असंही ते म्हणाले.

Shraddha Kapoor, Madhuri Dixit
सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीने सारा झाली भावूक...

बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची कन्या असलेल्या श्रद्धानं 'आशिकी २' या सिनेमातंन बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्या सिनेमातनं आपल्या अभिनयानं नाही पण भोळ्या आणि देखण्या चेह-यानं तिनं प्रेक्षकांना आपलसं केलं. त्यानंतर 'बागी','एबीसीडी','एक व्हिलन','छिछोरे','स्त्री' अशा अनेक सिनेमांतनं तिनं काम केलंय. बॉक्सऑफिसवर तिच्या ब-याच सिनेमांनी चांगलं कलेक्शन केलं आहे. गेल्या काही वर्षात तिनं आपल्या अभिनयात आणि नृत्यातही बरीच प्रगती केलेली दिसतेय. श्रद्धा खूप चांगलं गातेही हे तिनं ब-याच कार्यक्रमातनं परफॉर्म केलेल्या गाण्यांवरनं दिसून आलंय. श्रद्धाची मावशी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे म्हणून मराठीशी तिचा जवळचा संबंध. त्यामुळेच की काय 'पुण्यश्लोक अहिल्या' भूमिका साकरण्यासाठी निर्मात्या-दिग्दर्शकांनी श्रद्धाला पसंती दिली असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. काहीही असो पण श्रद्धाच्या पदरात ऐतिहासिक भूमिका पडल्याने तिची मात्र चलती आहे असंच म्हणावं लागेल. आता तिने त्या भूमिकेला न्याय द्यावा हीच इच्छा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com