एक हळवा सीन... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सध्या श्रद्धा कपूर आणि तिचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूर "हसीना : द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटासाठी चित्रीकरण करताहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच दोघे ऑन स्क्रिनही सख्ख्या भावा-बहिणीची भूमिका करत आहेत. हा चित्रपट आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हसीना पारकर या बहिणीच्या आयुष्यावर आधारित. यामध्ये श्रद्धा हसीनाची भूमिका करत्येय; तर सिद्धांत दाऊदची. या चित्रपटातील एक विशेष सीन करताना श्रद्धा आणि सिद्धांत दोघे इतके त्या सीनमध्ये मग्न झाले, की भावूक होऊन अक्षरश: त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दोघांना बघून सेटवरची सगळी मंडळी अक्षरश: हेलावून गेली.

सध्या श्रद्धा कपूर आणि तिचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूर "हसीना : द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटासाठी चित्रीकरण करताहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच दोघे ऑन स्क्रिनही सख्ख्या भावा-बहिणीची भूमिका करत आहेत. हा चित्रपट आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हसीना पारकर या बहिणीच्या आयुष्यावर आधारित. यामध्ये श्रद्धा हसीनाची भूमिका करत्येय; तर सिद्धांत दाऊदची. या चित्रपटातील एक विशेष सीन करताना श्रद्धा आणि सिद्धांत दोघे इतके त्या सीनमध्ये मग्न झाले, की भावूक होऊन अक्षरश: त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दोघांना बघून सेटवरची सगळी मंडळी अक्षरश: हेलावून गेली. एवढंच काय; तर या चित्रपटाचा दिग्दर्शक अपूर्व लाखियाला एक तास शूटिंग थांबवावं लागलं. कारण कोणीच काम करण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सगळे जण सावरल्यावर शूटिंग परत सुरू करण्यात आलं. त्यामुळे हसीना ः द क्वीन ऑफ मुंबई' हा चित्रपट श्रद्धा आणि सिद्धांतच्या खिडकीतोड अभिनयासाठी वाखाणला जाणार एववढं नक्की! 
 

Web Title: shraddha kapoor and siddhant kapoor

टॅग्स